
PUNE NEWS: BJP's 'micro-management' in Ward 25: Determined to win by a large margin.
Pune Municipal Corporation Election : मतदार यादीचे वाचन, मतदारांना स्लिप पाठवणे आणि घरोघरी प्रचाराची तयारी अशा निवडणूक वातावरणाने, प्रभाग २५ मधील भाजपाची निवडणूक कचेरीत गजबजली आहे. तळागाळात संघटनेचे जाळे पसरलेल्या भारतीय जनता पक्षाने, प्रभाग २५ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निश्चय केला आहे. प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई या प्रभागात भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित निवडणूक लढवीत आहेत.
हेही वाचा : रोहित शर्माच्या फिटनेसची चलती! विराट कोहलीलाही टाकले मागे? ‘हिटमॅन’चा सुपर अवतार पाहिलात का? पहा VIDEO
‘आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागात आम्ही निवडणूक लढवीत आहोत. निवडणूक ही नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन, भाजपा गांभीर्याने लढते. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेहनतीने, अनेक वर्षांपासून उभी राहिलेली संघटनेची फळी, निवडणुकीचे मायक्रो मॅनेजमेंट आणि प्रत्येक विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवत असलेले कार्यकर्ते या जोरावर प्रभाग २५ मध्ये मोठा विजय मिळवण्याचा निर्धार आम्ही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे’ असे भाजपाचे कसबा विधानसभा अध्यक्ष अमित कंक यांनी सांगितले.
प्रभाग २५ चे पदाधिकारी मनोज खत्री, किरण जगदाळे, निलेश कदम, संतोष फडतरे, मनीष जाधव, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, प्रणव गंजीवाले, अनंत कुंटे, धनंजय डिंबळे, अजित सुकादने, योगिता गोगावले, रुपाली कदम, दिलीप पवार, सोहम भोसले, आदेश पारवे, अमित सोनवणे, अनिल पवार, बिपीन बोरावके, श्रेयस लेले यांच्यासह सर्व हजारी भाग प्रमुख व सर्व कार्यकर्ते या विजयासाठी परिश्रम घेत आहेत.
हेही वाचा : “हे सगळं काय आहे भाऊ..? Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ पाहून रविचंद्रन अश्विनही झाला अवाक