पिंपरी-चिंचवडच्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, महिलेने केले गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
पुणे : इन्स्टाग्रामवर पुण्यातील महिलेशी ओळख करून तिला लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारिरीक संबंध निर्माण करून लग्न न करता फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अजिंक्य रायसिंग जाधव (वय ३२, रा. पिंपरी-चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत ३४ वर्षीय पिडीत महिलेने पुण्यातील फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ६९, ११५(२), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अजिंक्य जाधव याची व पिडीत महिलेची २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीनंतर अजिंक्य जाधव याने महिलेला कपटपुर्व विवाह करण्याचे वचन दिले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पिडीतेशी शारिरीक संबंध निर्माण केला. तसेच, नंतर महिलेला शिवीगाळ व मारहाण केली. तर तुला काय करायच ते कर, मला कोणी काही करू शकत नाही, अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! सासू, नणंदेसह तिघांना न्यायालयाचा दणका
आधी इंस्टावर मैत्री, नंतर ७ जणांकडून सामूहिक अत्याचार
हगेल्या काही दिवसाखाली कल्याणमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर मैत्री करणं चांगलाच भोवलं आहे. अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर मैत्री करून ७ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. एवढंच नाही तर या नराधम आरोपींनी तिच्यासोबत संबंध प्रस्तापित करून तिचा व्हिडीओ तयार केला आणि तो आपल्या मित्रतांना पाठवला. तिला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ महिने तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजार केले आहे. कल्याण न्यायालयाने सातही जणांना 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन विद्यार्थींनीवर अत्याचार करणारे हे नराधम धनाढ्य कुटुंबातील असल्याची माहिती आहे. पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत राहते. ही घटना कल्याण येथे घडली.