Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच; भरधाव दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2025 | 01:13 PM
पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच; भरधाव दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच; भरधाव दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हडपसर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

सुधाकर दादाराव झांबरे (वय ८०, रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार रमेश सदाशिव वाडकर (रा. हांडेवाडी रस्ता हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत झांबरे यांच्या पत्नी शांता झांबरे (वय ७०) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुधाकर झांबरे हे १६ नोव्हेंबर रोजी हडपसर भागातून निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने पादचारी झांबरे यांना पाठीमागून धडक दिली. अपघातात झांबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्मालयात गेले. तीन महिने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

दीर- भावजयचा मृत्यू

गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पाषाण भागात पादचाऱ्याचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशिषकुमार सर्वानंद उपाध्याय (वय २६, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आशिषकुमार यांचा भाऊ अभिषेकुमार (वय ३१) यांनी चतु:शृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास आशिषकुमार पाषाण रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी ‘डीआरडीओ’ संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या आशिषकुमार यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक श्यामल पाटील तपास करत आहेत.

Web Title: A citizen has died in a collision with a speeding bike in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • Accident News
  • Death
  • maharashtra
  • Pune Accident
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी
1

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

Nashik News : उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका
2

Nashik News : उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार, पीएमआरडीएकडून विकास आराखडा जाहीर; पर्यटनासाठी तब्बल…
3

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार, पीएमआरडीएकडून विकास आराखडा जाहीर; पर्यटनासाठी तब्बल…

हृदयरुग्णांना ‘त्या दिवशीच डिस्चार्ज’ शक्य! केईएम रुग्णालयातील नव्या सुविधांनी रुग्णांना मोठा दिलासा
4

हृदयरुग्णांना ‘त्या दिवशीच डिस्चार्ज’ शक्य! केईएम रुग्णालयातील नव्या सुविधांनी रुग्णांना मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.