
पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात हाणामारी; जयसिंगपुरमध्ये नेमकं काय घडलं?
उदगाव येथील संशयित आरोपी माहेश्वरी राजेंद्र पाटील व श्रीवर्धन शिरीष वरेकर हे एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आमच्या गावातील वाद आहे, आम्ही गावात जावून बैठक घेतो, असं सांगून पोलीस ठाण्यातून निघून गेले. यावेळी संशयित आरोपी राजेंद्र बंडू पाटील (वय ४२), युवराज राजेंद्र पाटील (वय २०), गंधराज राजेंद्र पाटील (वय १९), मंगल बंडू पाटील (वय ४०), शरद पांडूरंग लुगडे (वय ४२), शिरीष तुकाराम वरेकर (वय ६०), हेमलता वरेकर (सर्वजण, राहणार, माळवाडी उदगाव, ता. शिरोळ) एकमेकाशी वाद करून एकमेकाशी भांडण करीत असताना एकमेकांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होते.
पोलिसांच्या समक्ष वादविवाद करून भांडण तंटा केला असल्याने पोलीस कॉन्स्टेबल फारूख अस्लम जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे हे अधिक तपास करत आहेत.