Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्रापूर- चाकण रस्त्यावर कंटेनरचा थरार; २५ ते ३० वाहनांना उडविले

भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवले आहे. अनेक जण जखमी आहेत. अपघातानंतर जमाव संतप्त झाला. त्यांनी कंटेनरवर चढून चालकाला बेदम मारहाण केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2025 | 04:31 PM
शिक्रापूर- चाकण रस्त्यावर कंटेनरचा थरार; २५ ते ३० वाहनांना उडविले
Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : शिक्रापूर- चाकण रस्ता नेहमी वेगवेगळ्या अपघातामुळे चर्चेत येत असताना नुकतेच चाकण बाजूने येणाऱ्या मद्यधुंद कंटेनर चालकाने अनेक वाहनांना धडक देत मध्ये पोलिसांच्या वाहनाला धडकून थेट शिक्रापूर जवळील जातेगाव खुर्द गाठले. अखेर शिक्रापूर पोलिसांना नागरिकांच्या मदतीने सदर कंटेनर चालकाला रोखण्यात यश आले मात्र जमलेल्या जमावाने सदर कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. चालकाला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चाकण- शिक्रापूर रस्त्याने टाटा कंपनीचा कार घेणून जाणारा एच आर ५५ ए व्ही २२८३ हा कंटेनर चाललेला असताना कंटेनर चालकाने चाकणमधील दोन व्यक्तींना धडक देत कंटेनर पुढे आला, यावेळी नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो तसाच पुढे जात काही वाहनांना धडक देत पुढे येत राहिला, बहुळ गावाजवळ चाकण पोलिसांनी त्या कंटेनर चालकाला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट पोलिसांच्या वाहनाला धडक देत पुढे गेला, त्यांनतर साबळेवाडी मधून कंटेनर चालकाने पुन्हा चाकण बाजूकडे वळण घेत पुन्हा थेट शिक्रापूरकडे निघत करंदी चौफुला येथे एका पिकअप सह एका युवतीला धडक देऊन जातेगाव खुर्द जवळ एका डंपरला ठोस दिली, सदर थरारावेळी चाकणपासून अनेक युवकांनी कंटेनरचा दुचाकीहून पाठलाग केला, यावेळी शिक्रापूर पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्याला रोखण्यात यश आले,

मात्र यावेळी जमलेल्या नागरिकांनी कंटेनरचालकाच्या दिशेने तुफान दगडफेक केली, यावेळी पोलीस शिपाई लखन शिरसकर यांनी दगडफेक व चालकाला काठ्यांनी मारहाण सुरु असताना शिताफीने कंटेनरच्या आतमध्ये जात चावी काढून घेतली असता जमावाने चालकाला खाली घेत बेदम मारहाण केली, यावेळी सदर चालकाला जबर मारहाण झाल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले, यावेळी रस्त्यांच्या दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान शिक्रापूर व चाकण पोलीस स्टेशन सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूककोंडी सुरळीत केली, यावेळी सदर कंटेनर चालकाचे नाव आकीब अब्दुल रज्जाक (वय २४ वर्षे रा. पचंका जि. पलवल राज्य हरियाना) असल्याचे समोर आले, तर या अपघातात तब्बल वीस ते पंचवीस वाहनांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे मात्र यावेळी सदर संपूर्ण घटनेचा रात्री उशिरापर्यंत पंचनामा होऊन अपघातात किती वाहनांचे नुकसान व किती जखमी हे समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा : सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान, ‘हिंमत असेल तर…’

पंचवीस किलोमीटर थरार

चाकण शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरने केलेल्या अपघातामध्ये चाकण पासून शिक्रापूर जवळील जातेगाव खुर्द गावाजवळ कंटेनर आला मात्र या पंचवीस किलोमीटर अंतरात त्याने पोलिसांच्या वाहनासह पंचवीस वाहनांना धडक दिल्याने नागरिकांना मद्यधुंद चालकाचा पंचवीस किलोमीटर थरार पाहण्यास मिळाला आहे.

Web Title: A container has hit many vehicles on the shikrapur chakan road nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Accident
  • Shikrapur

संबंधित बातम्या

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
1

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
2

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…
3

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
4

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.