महिला कैद्यांनाही मिळू शकतो मोफत वकील; भारतीय संविधानातच आहे तरतूद
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून येरवडा कारागृहातील कैद्याला दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत एक कैदी जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन कैद्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तत्पुर्वी येरवडा कारागृहातील कैद्यांमधील वाद तसेच कैदी पळून जाण्याच्या घटना वाढत आहेत. त्यासोबतच कैदी कारागृहातून पळ काढत असल्याचे दिसत आहे.
सुधीर गौतम थोरात असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कारागृहातील कैदी विकी उर्फ विवेक राजेश खराडे, अली अदम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृहातील रक्षक विश्वास वाकडे (वय ४३) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हे सुद्धा वाचा : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; खराडीत पोलिसांची मोठी कारवाई
पोलिसांच्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील बराकीत १४ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कैदी सुधीर थोरात याला विकी खराडे, अली शेख यांनी अडवले. ‘कारागृहातून कधी सुटणार?’, अशी विचारणा केली. यावरुन त्यांच्यात वाद झाला. वादानंतर खराडे आणि शेख यांनी थोरात याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत थोरातची बरगडी, तसेच नाकाला दुखापत झाली. कारागृहात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी त्वरीत तेथे धाव घेतली. थोरातला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर प्रथमोपाचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेच्या निरीक्षक पल्लवी मेहेर यांनी कारागृहास भेट दिली. सहायक निरीक्षक विशाल टकले अधिक तपास करत आहेत.
कैद्यांची संख्या कारागृहात मोठी
राज्यातील सर्वात जुने कारागृह म्हणून पुणे शहरातील येरवडा मध्यवर्ती कारागृह आहे. हे कारागृह नेहमी हाऊसफुल्ल असते. या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत. जन्मठेप किंवा इतर शिक्षेचे आरोपी कारागृहात आहे. खून प्रकरणात शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या कारागृहात मोठी आहे. त्यानंतर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आहे. पुणे शहरातील ऐतिहासिक येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या प्रकारामुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज्यातील सर्वात जुने आणि मोठे कारागृह असलेल्या येरवडा जेलमधील सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे तुरुंग प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या काही महिन्याखाली येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये राडा झाला. प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे, वैभव थिटे, तेजस बाळासाहेब बच्छाव यांच्यांमध्ये हाणामारी झाली आहे. जेलमध्ये कैद्यांकडून झालेल्या हाणामारीत एक कैदी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.