Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

जळगाव तालुका पोलीस ठाण्यात या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा 'मॉब लिंचिंग'चा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2026 | 07:57 AM
जळगावमध्ये मॉब लिंचिंग, तरुणाचा मृत्यू

जळगावमध्ये मॉब लिंचिंग, तरुणाचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली आहे. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरुन हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेचा सखोल तपास करताना मयत तरुणाची ओळख पटविण्याचे आव्हानही पोलिसांच्या समोर आहे.

गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मनोहर सोनवणे, अजय कोळी, प्रशांत सोनवणे, अजय ऊर्फ बादल सोनवणे आणि अफताब आरिफ खाटीक अशा पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘मॉब लिंचिंग’चा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग परिसरात, एक अनोळखी तरुण संशयास्पदरित्या वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर भगवान सोनवणे यांचा ३ वर्षांचा मुलगा विराट उर्फ लकी याला उचलून घेऊन जात असल्याचा संशय उपस्थितांना आला. या संशयाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि बघता बघता मोठा जमाव गोळा झाला. जमावाने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा पोलिसांना कळवण्याऐवजी सदर तरुणाला पकडून लाथा-बुक्क्यांनी आणि मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीत नाका-तोंडातून रक्त

अव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत होते आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या.

पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने तरुणाला प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भवानी पेठेतील कासेवाडी भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

Web Title: Youth brutally beaten by mob on suspicion of kidnapping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • crime news
  • Jalgaon News

संबंधित बातम्या

Crime News: पाबळमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; काच फोडून रोकड लुटली
1

Crime News: पाबळमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; काच फोडून रोकड लुटली

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यवसायिकासह तिघांना ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांची मोठी कारवाई
2

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यवसायिकासह तिघांना ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai News : मृत बाळाला कपड्यात गुंडाळलं अन्… ; अंगावर काटा आणणारा वाडिया रुग्णालयाबाहेचा तो व्हिडीओ
3

Mumbai News : मृत बाळाला कपड्यात गुंडाळलं अन्… ; अंगावर काटा आणणारा वाडिया रुग्णालयाबाहेचा तो व्हिडीओ

ब्रेकअप झाल्याने फार्मसीची विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन
4

ब्रेकअप झाल्याने फार्मसीची विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.