Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

केतन अग्रवालला टक्कल होते म्हणून लग्न करायचे नव्हते, असे सियाने पोलिस तपासात सांगितले आणि हाच धागा पकडून डॉ. मुस्कान सोनी हिने केतनची खिल्ली उडवली होती. मात्र असे करणे डॉ. सोनीला चांगलेच महागात पडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2026 | 02:42 PM
केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर उद्योजक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू सध्या चर्चेचा विषय आहे. देशभरात या प्रकरणावर चर्चा होत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासेही समोर येत आहेत. अशातच आता केतन अग्रवालला टक्कल होते म्हणून लग्न करायचे नव्हते, असे सियाने पोलिस तपासात सांगितले आणि हाच धागा पकडून डॉ. मुस्कान सोनी हिने केतनची खिल्ली उडवली होती. मात्र असे करणे डॉ. सोनीला चांगलेच महागात पडले असून, तिच्यावर ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अॅण्ड सर्जन्स असोसिएशनने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसेच पाच वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

 

केतन अग्रवालच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, डॉ. सोनी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या घटनेची थट्टा करणारी एक ‘स्टोरी’ पोस्ट केल्याचा आरोप आहे. संघटनेने ही पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह, अपमानजनक आणि संघटनेच्या नैतिक मूल्यांशी विसंगत असल्याचे मानले.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्ट

मुस्कान नेमके काय म्हणाली?

डेंटल असलेल्या डॉ. मुस्कान सोनी हिच्या व्हायरल व्हिडीओमध्ये असे ऐकू येतेय की, तो माणूस टक्कल असलेला होता. अशा पुरुषांनी मरायलाच हवे, दोन जणांचा मृत्यू झालाय आणि संपूर्ण समाज दहशतीखाली आहे’, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि मुस्कान सोनीला जोरदार ट्रोल केले जाऊ लागले. ट्रोलिंग वाढल्यानंतर सोनीने एक व्हिडीओ शेअर केला आणि माफी मागितली. इतक्या संवेदनशील विषयाची थट्टा करण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता, असं तिनं स्पष्ट केले.

मी वापरलेल्या शब्दांसाठी मनापासून माफी मागते. लिंगाच्या आधारावर मी कधीही कोणाचाही अवमान करत नाही. मी माझ्या पोस्ट्समध्ये #ihatemen हा हॅशटॅग वापरते हे खरंय. तो काढून टाकण्याची माझी तयारी आहे. मात्र, माझ्या आयुष्यात घडलेल्या काही विशिष्ट घटनांमुळेच मला हा हॅशटॅग वापरावा लागला. – डॉ. मुस्कान सोनी.

केतन अग्रवाल हत्या प्रकरण

पुण्यातील नामांकित बिझनेसमन विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा गेल्या महिन्या, 18 जून रोजी लोहगडावरून खाली कोसळून मृत्यू झाला. आधी सर्वांना हा अपघात वाटत होता,मात् केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनीच कट रचून त्याला खाली ढकलून त्याची हत्या केली अशी माहिती समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. दोन्ही आरोपींनी केतनला किल्ल्यातील एका उंच ठिकाणी नेऊन, तिथून त्याला खोल दरीत ढकलले. घटनेनंतर, आरोपींनी मोठ्या चलाखीने केतन घसरून झालेला अपघात असल्याचे भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्स तपासल्यावर आणि कसून चौकशी केल्यावर सत्य उघडकीस येऊ लागलं. केतनचा अपघात नसून, एक पूर्वनियोजित, खुनी कट असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: A female doctor has been suspended for making a joke about ketan agarwals death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Ketan Agarwal
  • Ketan Agrawal Murder Case
  • pune news

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Case : केतन हत्येप्रकरणात तपासात पोलिसांना येते ‘ही’ मोठी अडचण; खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी…
1

Ketan Agrawal Case : केतन हत्येप्रकरणात तपासात पोलिसांना येते ‘ही’ मोठी अडचण; खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी…

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
2

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?
3

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
4

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.