crime (फोटो सौजन्य: social media)
हैद्राबाद येथील नामपल्ली परिसरात एका जुन्या बंद घरात मानवी हडांचा सापळा सापडला. पोलीस तपासात धक्कदायक माहिती समोर आली की हा मृतदेह १० वर्षापाहिलेचा आहे. या प्रकरणात एका जुन्या नोकिया फोनने पोलिसाना या रहस्यमय प्रकरणाचा उलगडा करण्यात महत्वाची भूमिका बजावली. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया?
पंढरपूर हादरलं! आई आणि मुलाची राहत्या घरात निर्घृण हत्या, कारण अद्याप अस्पष्ट
कसा लागला शोध?
नामपल्ली परिसरात सोमवारी स्थानिक तरुण क्रिकेट खेळात होते. तेव्हा क्रिकेटचा चेंडू एका बंद घरात गेला. तेव्हा स्थानिक तरुण क्रिकेटचा चेंडू आण्यासाठी त्या बंद घरात शिरला आणि हाडाचा सापळा पाहून थक्क झाला. हे घर गेल्या सात वर्षांपासून बंद होते. जेव्हा पोलिसांनी टाळा तोडून घराची तपासणी केली, तेव्हा तिथे एक हाडांचा सापळा आणि त्याच्याजवळ एक जुना नोकिया फोन आढळला. सुरुवातीला पोलिसांना संशय होता की हा खुनाचा खटला असू शकतो, पण फोनच्या तपासाने संपूर्ण कहाणी बदलली.
फोन चार्ज करून चालू केल्यावर त्यात 84 मिस्ड कॉल्स आढळले, जे मृतकाच्या नातेवाईकांनी केले होते. तेव्हा समजले हे हा फोन आणि मृतदेह ५५ वर्षीय अमीर खान या व्यक्तीचे आहे. हे कॉल्स २०१५ च्या आसपासचे होते, जेव्हा अमिर खान बेपत्ता झाला होता.
पोलिसांच्या मते, अमीर खान हा मुनीर खान यांच्या दहा मुलांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा होता. तो या घरात एकटाच राहत होता. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य दुसरीकडे स्थलांतरित झाले होते. तपासात असे दिसून आले की २०१५ मध्ये अमीर याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, कदाचित एकाद्या आजारामुळे किंवा एकटेपणामुळे. फोनमधील कॉल्स आणि घरात सापडलेल्या जुन्या नोटा (2016 च्या नोटबंदीपूर्वीच्या) यावरून पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की त्याचा मृत्यू बराच आधी झाला होता.
डीसीपी चंद्रमोहन यांनी सांगितले की, हे एक न सुटलेले प्रकरण होते. पण नोकिया फोनने आम्हाला योग्य दिशा दाखवली. घरातून जुन्या नोटा सापडल्याने हेही सूचित होते की आमिरने शेवटचे २०१६ पूर्वी तिथे वेळ घालवला होता. पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू मानून हे प्रकरण बंद करण्याची तयारी केली आहे. पण मृत्यूच्या अचूक कारणांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. स्थानिक लोक या घटनेमुळे चकित झाले आहेत आणि याला एक अनोखी कथा मानत आहेत, जिथे तंत्रज्ञानाने दशकभर जुने रहस्य उलगडले.
कारच्या चाकातील हवा कमी असल्याचा चोरट्यांनी बहाणा केला अन् रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला