रेल्वेखाली ढकलून महिलेची हत्या
पंढरपूर शहरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आई आणि मुलाची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कुंभार गल्लीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे. या घटनेनंतर तातडीने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास करत आहे.
Beed Crime News: पिंपळनेरमध्ये खळबळ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पाच महिन्यांची गर्भवती
हत्या झालेल्या तरुणाचे नाव लखन जगताप आणि त्याची आई सुरेख जगताप असे आहे. त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्यामध्ये लाखांच्या पाठीवर आणि डोक्यावर वार करण्यात आले. तर आई सुरेखा जगताप त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले आहे. लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली? कुठल्या कारणावरून करण्यात आली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. घटनेनंतर तातडीने पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तपास सुरू केला आहे.
सावत्र मुलीची बापानेच केली हत्या;पत्नीसोबत वेळ घालवण्यात ठरत होती अडचण
दरम्यान, मुंबई येथून एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. सावत्र पित्याने चार वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्याचा कारण पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण ठरत होती. चिमुकली अशिरापर्यंत मोबाईलवर खेळात असल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येचा उलगडा झाला असून वरळीवरून आरोपी इम्रान शेखला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुर, चार वर्षांची चिमुरडी रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळात असायची. परिणामी इम्रान शेखला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत होती. दरम्यान, हाच राग मनात ठेवून इमरानने अतिशय क्रूरपणे गळा आवळून चार वर्षीय चिमुलीची हत्या केली असल्याचे समोर आले. त्यांनतर हे कृत्य कुणाला कळू नये म्हणून मृतदेह कुलाबा येथील समुद्रात फेकला. मात्र दुसऱ्यादिवशी सकाळी ससून डॉकजवळ चिमुरडीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास सुरु करत चौकशी केली असता पोलिसांना संशय आला. मुलगी बेपत्ता झाली तेव्हापासून इमरान शेख देखील बेपत्ता असल्याने हा संशय अधिक बळावला. अखेर पोलीस तपासात सत्य बाहेर आलं आणि अँटॉप हिल पोलिसांनी वरळीवरून इमरान शेखला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.