Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोलकरणीचे प्रेमासाठी वाट्टेल ते ! मालकाचा विश्वासघात केला अन् केलं असं काही की…

मारिया ही मूळची पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. ती विनायकनगर परिसरात भाड्याने राहात होती. जवळपास वर्षभरापूर्वी ती नुपूर यांच्या घरी मोलकरीण म्हणून कामाला होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2025 | 10:57 AM
मालकाचा विश्वासघात करून चोरल्या चक्क हिऱ्याच्या अंगठ्या

मालकाचा विश्वासघात करून चोरल्या चक्क हिऱ्याच्या अंगठ्या

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : प्रियकरासाठी एका मोलकरीणने मालकाचा विश्वासघात केला. ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये काढून ठेवलेल्या दोन हिरेजडित अंगठ्या चोरी करून पसार झाली. त्या अंगठ्या तिने प्रियकराला भेट दिल्या. तक्रार मिळताच जरीपटका पोलिसांनी गुन्हा नोंदवून महिलेचा शोध सुरू केला. मोबाईलचा सीडीआर आणि लोकेशनच्या आधारावर तिला हुडकून काढत पश्चिम बंगालमधून अटक केली. तर तिच्या प्रियकरालाही नाशिक येथून अटक करण्यात आली.

मारिया सूर्यराव सुक्का (वय 25) आणि पवन भास्कर बडगुजर (वय 30, रा. सप्तश्रृंगी चौक, सिडको, नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी नुपूर अनिरुद्ध अग्रवाल रा. विनायकनगर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. मारिया ही मूळची पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. ती विनायकनगर परिसरात भाड्याने राहात होती. जवळपास वर्षभरापूर्वी ती नुपूर यांच्या घरी मोलकरीण म्हणून कामाला होती. दरम्यान, तिने काम सोडले होते. गेल्या 17 मे रोजी नुपूर यांचे पती व आई-वडील यांना कामाने गावाला गेले होते. नुपूर एकट्याच घरी होत्या. त्यामुळे नुपूर यांनी मारियाला तीन दिवसांसाठी त्यांच्या बाळाची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवले होते.

18 मे रोजी मारियाने नुपूरला नाशिक येथे राहणारा प्रियकर पवन याच्यासोबत लग्न करायचे
असल्याने 50 हजार रुपये उसने मागितले होते. मात्र, नुपूरने पैसे देण्यास नकार दिला होता. रात्री 10 वाजताच्या सुमारास मारिया बाळाची देखभाल करण्यासाठी बेडरूममध्ये गेली. यावेळी तिला ड्रेसिंग टेबलच्या ड्राव्हरमध्ये दोन हिरे जडित अंगठ्या दिसल्या. तिने त्या अंगठ्या चोरी केल्या आणि मुलाला झोपवून बाहेर आली.

नंतर कामावर परतलीच नाही…

दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मेच्या सकाळी घरकाम आटोपून मारीया निघून गेली आणि परत आली नाही. इकडे मारिया यांनी ड्राव्हर उघडले असता त्यांच्या अंगठ्या गायब होत्या. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मारिया चोरी करताना दिसली. त्यांनी जरीपटका ठाण्यात मारियाविरुद्ध तक्रार दाखल केली.

तांत्रिक तपासात लागला शोध

पोलिसांनी गुन्हा नोंदवून मारियाचा शोध सुरू केला. चोरी करण्यापूर्वी ती कोणाच्या संपर्कात होती, याचा शोध घेण्यासाठी तिच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला. तसेच तिचे लोकेशन शोधले असता ते पश्चिम बंगालचे खरगपूर रेल्वे स्टेशन येथे मिळाले. तत्काळ एक पथक खरगपूरला रवाना करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मारियाला शोधून काढत तिला अटक करण्यात आली.

Web Title: A maid woman theft diamond ring incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Nagpur News
  • Theft Cases

संबंधित बातम्या

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत; तब्बल 28 चाकूसह कोयतेही जप्त
1

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत; तब्बल 28 चाकूसह कोयतेही जप्त

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला
2

पीएमपी बसमध्ये चोरीच्या घटना सुरुच; प्रवासी महिलांकडील लाखोंचा ऐवज चोरला

नागपूर शहरात 20 ऑगस्टपासून ट्रॅव्हल्स बसेसना ‘नो एंट्री’; पोलिस आयुक्तांनीच काढले आदेश
3

नागपूर शहरात 20 ऑगस्टपासून ट्रॅव्हल्स बसेसना ‘नो एंट्री’; पोलिस आयुक्तांनीच काढले आदेश

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
4

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.