बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! (Photo Credit- X)
कारवाई आणि जप्त मुद्देमाल
या प्रकरणी शेख इर्शाद शेख शहेजाद (३५, रा. राहतनगर, जटवाडा रोड, हसुल) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार तय्यब मुंबईवाला (रा. मुंब्रा, नवी मुंबई) याचा शोध सुरू असून दोघांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, हवालदार सुनील जाधव, सुनील पाटील, दीपक शिंदे, वाडीलाल जाधव आदींनी ही कारवाई केली.
घरावर टाकला छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेला ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळाली की, पडेगाव परिसरातील एका घरात विविध कंपन्यांच्या गुटखा व सुगंधित तंबाखूचे पॅकिंग केले जात आहे. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर, उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे आणि त्यांच्या पथकाने घरावर छापा टाकला. तपासणीदरम्यान पोलिसांनी शेख इर्शाद याला ताब्यात घेतले.
तय्यब मुख्य आरोपी
या गुन्ह्यात तय्यब मुंबईवाला हा मुख्य आरोपी असून त्यानेच घरात कारखाना उभारून बनावट गुटखा व पानमसाला तयार करण्यासाठी शेख इर्शादला प्रवृत्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी तय्यबने आर्थिक मदत दिल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. याशिवाय तय्यबने आणखी एक-दोन जणांना अशाच पद्धतीने घरगुती कारखाने चालविण्यास तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांनी वर्तविली आहे.






