तत्कालीन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि चंदगड पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावाला पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी आणि त्यांचे नाव काळ्या यादीत घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून पंचायत समितीचे तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कोणती कारवाई करणार? ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार काय.? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेली 12 ते 13 वर्षे रेंगाळत पडलेल्या या योजनेच्या कामाची दखल संबंधित चंदगड पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
सन2012 ते 2013 साली पोरेवाडी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला. गावच्या परिसरात पाण्याचा मुबलक स्रोत नसल्याने या योजनेसाठी आमरोळी गावच्या बोकूडशेत नावाच्या शेतात घटप्रभा नदीच्या काठावर जॅकवेल बांधण्यात आले. ठेकेदार धोंडीबा पाटील (जट्टेवाडी) यांनी या योजनेचा ठेका घेतला. मात्र योजनेच्या कामासाठी दर्जेदार साहित्य वापरले नाही. त्यामुळे या योजनेच्या कामाचा दर्जा निकृष्ट झाला आहे. हि योजना आता उद्घाटनाच्या आधीच कोलमडली असून गावातील पाण्याच्या टाकीत पाणी पडण्या आधीच अर्ध्या कोटीची
रक्कम घटाभा नदीच्या पायात वाहन गेली आहे.
8 गेल्या दोन अडीच वर्षांपासून संबंधित चंदगड पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडे या योजनेच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत आहे. या योजनेचे काम अपूर्ण आहे. अंदाज – पत्रकह्यमाणे केले नाही. ग्रामस्थांच्या तक्रारी वाढत आहेत. तरी संबंधीत ठेकेदाराना सुचना देवून काम पूर्ण करावे. आणि ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर – रावी अशी गावची मागणी आहे.
– प्रकाश वाईगडे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमरोळी-पोरेवाडी.
एक योजना पूर्ण होण्याआधीच पोरेवाडी गावासाठी सन 2020 , 2021 या वर्षात 23 लाखाची जलजीवन योजना मंजूर केली आहे. जिल्हा परिषद कोल्हापूरचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच संबंधीत चंदगड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यानी प्रत्यक्ष पहाणी केलीच नाही त्यामुळे नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. लाखो रुपयांच्या योजना मंजूर केल्या आहेत. त्या योजनेकडे संबंधित अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याने कामे निकृष्ट दर्जाची होत असून त्या लवकरच भुईसपाट होत आहेत. ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे साऱ्या गावाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे. मे 2026 रोजी महालक्ष्मी देवीची यात्रा आहे. त्यामुळे या रखडत पडलेल्या योजनेचे काम पूर्ण करावे आणि गावाला पिण्याच्या पाण्याचा मुबलक प्रमाणात पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Ans: सन 2012–2013 मध्ये पोरेवाडी गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे 50 लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती.
Ans: गावाजवळ पाण्याचा मुबलक स्रोत नसल्याने आमरोळी गावच्या बोकूडशेत परिसरात घटप्रभा नदीच्या काठावर जॅकवेल बांधण्यात आला.
Ans: ठेकेदाराने दर्जेदार साहित्य न वापरल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाले. तसेच पाणीपुरवठा विभाग व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजना 12–13 वर्षे रखडली.






