
किरकोळ वादातून दोघांवर चाकूहल्ला
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना आता संभाजीनगर येथे किरकोळ वादातून दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी (दि.25) घडली.
जोहेब शोएब पठाण (रा. चाऊस कॉलनी, शहाबाजार) असे चाकू हल्ला करणाऱ्याचे नाव असून त्याच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात श्रीकांत रंगनाथ कोमटवार (वय ३२, रा. विवेकानंद नगर, टीव्ही सेंटर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे मनपा कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहेत. २५ ऑक्टोबर रोजी रात्री ते मित्रांसमवेत गप्पा मारत बसलेले असताना आरोपी जोहेब पठाण हा अचानक तेथे आला. आणि त्याने ‘मेरे अब्बु को किसने मारा’ असे म्हणत दोघांवर चाकू हल्ला करुन गंभीर जखमी केले.
हेदेखील वाचा : Breakup मुळे संतापलेल्या प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला, नंतर स्वतःचा गळा चिरला
फिर्यादीचा मित्र शुभम दुबकवाड यास लाथ मारली. शुभम खाली पडल्यावर आरोपीने कंबरेला लावलेला चाकू बाहेर काढून शिवीगाळ करत मारहाणीबाबत विचारणा करायला सुरुवात केली.
रागाच्या भरात हल्ला
यावर फिर्यादी व त्याचे मित्र यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, आरोपीला त्याच्या वडिलांना कोणी तरी दुचाकीने धक्का देत मारहाण केल्याचा समज झाला. त्यामुळे त्याने रागाच्या भरात चाकूने वार केले. या हल्ल्यात फिर्यादी श्रीकांत कोमटवार व त्याचा मित्र योगेश असे दोघे गंभीर जखमी झाले. आरोपीने त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
प्रेयसीवर जीवघेणा हल्ला
दुसरीकडे, मुंबईत अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका प्रियकराने त्याच्या एक्स प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांचे दहा दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. पीडिता बेरोजगार होती, त्याने तिची हत्या केली आणि नंतर स्वतःचा गळा चिरला.