Breakup मुळे संतापलेल्या प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला, नंतर स्वतःचा गळा चिरला (फोटो सौजन्य-X)
Mumbai Crime News Marathi: नातं तोडायला दोन मिनिटंही लागत नाही, पण तेच नातं जोडायला बराच वेळ लागतो. त्याचप्रमाणे प्रेम करणं तसं सोप्प आहे. पण ते निभावणं तितकीच कठीण.. प्रेमात जोडीदाराकडून छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मन दुखणे सामान्य आहे. परंतु काहीवेळा समस्या इतकी गंभीर होते की, एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका प्रियकराने त्याच्या एक्स प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांचे दहा दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. पीडिता बेरोजगार होती, त्याने तिची हत्या केली आणि नंतर स्वतःचा गळा चिरला.
लालबाग काळाचौकी परिसरात प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाल्यामुळे संतापलेल्या २४ वर्षीय बेरोजगार आरोपीने हत्येचा मार्ग अवलंबला. आरोपी तरुणाने तरुणीला रस्त्यात बेदम मारहाण केली, त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर ही तरुणी स्वतःचा बचाव करण्यासाठी जवळ असलेल्या आस्था नर्सिग होममध्ये शिरली. तरुणाने नर्सिंग होममध्ये घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि नंतर स्वतःचा गळा चिरला. या घटनेनंतर या दोघांना तात्काळ केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि परिसरात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी लालबागच्या चिंचपोकळी परिसरात घडली.आरोपीने चाकूने वार करण्याच्या उद्देशाने महिलेचा दूरवरून पाठलाग केला. त्यानंतर त्याने तिला प्रसूती रुग्णालयासमोर पकडले आणि तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनू बरई याचा मृत्यू झाला, तर २४ वर्षीय मनीषा यादव ही एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. काळाचौकी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना सकाळी १०:३० च्या सुमारास चिंचपोकळीजवळील दत्ताराम लाड मार्गावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि महिला काळाचौकी पोलीस स्टेशनहून चिंचपोकळी स्टेशनकडे चालत जात होते. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, त्या पुरूषाने अचानक रस्त्यावर महिलेवर चाकूने हल्ला केला. तिचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात, ती महिला जवळच्या नर्सिंग होममध्ये पळून गेली. हल्लेखोर तिच्या मागे आत गेला आणि तिच्यावर अनेक वार केले. स्थानिक आणि नर्सिंग होम कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या पुरूषाने स्वतःवर चाकू फिरवला आणि त्याचा गळा कापला.
दोघांनाही उपचारासाठी तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर काळाचौकी पोलीस आणि पोलिस उपायुक्त (झोन ४) आर. रागसुधा घटनास्थळी पोहोचले. केईएम रुग्णालयात पोलिसांचे पथकही तैनात करण्यात आले आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते, परंतु अलीकडेच त्यांचे नाते तुटले कारण आरोपीला मुलीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंधी असल्याचा संशय होता. शुक्रवारी, आरोपीने मुलीला जवळच भेटण्यासाठी बोलावले होते, त्यावेळी वाद झाला आणि त्याने तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.






