crime (फोटो सौजन्य: social media)
पुण्यपात एका शिक्षकाने विध्यार्थ्यांना परीक्षेत पास करतो असं म्हणत लाखो रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीचा गणिताचा पेपर पास करून देण्यासाठी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वाघोली भागात असलेल्या पार्वतीबाई गेन्बा मोझे या महाविद्यालयातील एक प्रोफेसरने हा प्रकार केल्याचं उघड झालं आहे. पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेने या प्रकरणी कारवाई करत या प्रोफेसरसह चौघांना बेड्या ठोकळ्यात आहेत.
प्राध्यापक प्रतिक किसन सातव यासह आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे अशी अटक केलेल्यांची नाव समोर येत आहे. परिक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 10 ते 50 हजार रुपये घेत असल्याचं समोर आलं आहे. प्राध्यापक सातव हा कॉलेजमध्ये दुपारी झालेला पहिल्या वर्षांचा इंजिनियरींगच्या गणिताचा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लिहिण्यासाठी देत होता.
आरोपीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित २ या विषयाचे लिहिलेल्या उत्तरपत्रिकेचे 6 बंडल तसेच रोख रक्कम 2 लाख 6 हजार रुपये व उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गणित 2 या विषयामध्ये नापास होण्याची भिती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी संगनमत करुन 10 ते 50 हजार रुपये मागायचे आणि त्याबदल्यात त्यांना पुन्हा एकदा परिक्षा सोडवायला देत होते.
नापास होण्याची धास्ती; विद्यार्थ्यांना हेरले
या प्रकरणातील मुख्य आरोपी प्राध्यापक प्रतीक सातव आणि साथीदारांनी ज्या विद्यार्थ्यांना गणित- 2 विषयात नापास होण्याची भीती होती अशा विद्यार्थ्यांना त्यांनी हेरलं. सातव आणि साथीदारांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 50 हजार रुपये घेतले. अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा कक्षाची (कंट्रोल रूम) बनावट चावी तयार करून घेतली. या चावीचा वापर करून गणित- 2 विषयाच्या उत्तरपत्रिकांचे सहा सीलबंद बंडल काढून घेतले. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका काढून घेतल्या. उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी दिल्या होत्या.