Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! अत्याचार कर, मग मारून टाक; अल्पवयीन विद्यार्थ्याने दिली सुपारी

सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक व शिक्षिका, अशा तिघांवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 29, 2025 | 11:01 AM
धक्कादायक ! अत्याचार कर, मग मारून टाक; अल्पवयीन विद्यार्थ्याने दिली सुपारी

धक्कादायक ! अत्याचार कर, मग मारून टाक; अल्पवयीन विद्यार्थ्याने दिली सुपारी

Follow Us
Close
Follow Us:

दौंड : विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उघडकीस आला आहे.

हेदेखील वाचा : GBS Update: गुलईन बेरी सिंड्रोमच्या आजारात रुग्ण दगावत नाही; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीने मुलांची बदनामी करण्याच्या हेतूने सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक व शिक्षिका, अशा तिघांवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दौंड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी दौंड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिक्षण घेत आहे. तिच्या वर्गातील विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती तिने वर्गशिक्षिकेला दिली होती. त्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्राने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीवर बलात्कार करून नंतर तिला हत्या करण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिली. मात्र, त्या विद्यार्थ्याने याबाबत माहिती विद्यार्थीनीला दिली. त्यानंतर तिच्या वडिलांनी मुख्याध्यापकांकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली.

विद्यार्थिनीवरच केला गेला आरोप

पोलिस चौकशीदरम्यान मुख्याध्यापकांनी विद्यार्थीनीच इतर विद्यार्थ्यांची बदनामी करत असल्याचे सांगितले. तसेच, मुलीने विद्यार्थ्याला 100 रुपये दिल्याचे म्हटले. शिवाय त्यांनी मुलीला दुसऱ्या शाळेत टाका, असे सुचविले. हे प्रकरण लपविण्यासाठी व शाळेची बदनामी टाळण्यासाठी मुख्याध्यापक व दोन शिक्षकांनी कटकारस्थान करून दुर्लक्ष केले. त्यामुळे पीडितेचे मानसिक व शैक्षणिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

हेदेखील वाचा : Crime News: अल्पवयीन मुलाचा विरोध नडला; पोलिसांकडून वडिलांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय?

Web Title: A minor student gave threaten to girl incident in daund nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • daund crime news
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Weather: पुण्याचं झालं काश्मीर! शहरात कडाक्याची थंडी; सर्वात नीचांकी तापमानाची नोंद
1

Pune Weather: पुण्याचं झालं काश्मीर! शहरात कडाक्याची थंडी; सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष
2

आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्…
3

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्…

Pune Election : पुण्यात काँग्रेस स्वबळावर की आघाडीमध्ये लढणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
4

Pune Election : पुण्यात काँग्रेस स्वबळावर की आघाडीमध्ये लढणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.