महराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मिडिया)
पुणे: पुणे शहर व परिसरात गुलईन बेरी सिंड्रोम (जीबीएस ) या आजाराचे एकूण १०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहे. सोलापूर मध्ये या आजाराचा संशयित एक रुग्ण दगावल्याबाबत माहीती घेण्यात येत आहे. या आजारात मृत्यू हाेत नाही, परंतु झाला असेल तर काळजी घ्यावी लागेल असे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.
मंत्री आबिटकर यांनी जीबीएसचे रुग्ण ज्या भागात जास्त आढळून आले अशा सिंहगड रस्ता भागात पाहणी केली. या भागातील नागरीकांनी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. साेलापुर येथे एक रुग्णाचा मृत्यू झाल्याबाबत विचारले असता, ते म्हणाले ‘‘याबाबत माहिती घेतली जात आहे.पण जीबीएसच्या आजारात रुग्ण दगावत नाही.यापूर्वी देखील अनेक रुग्ण हे जीबीएस चे आढळले आहे आणि यात रुग्णांना त्रास झाला आणि ते ऍडमिट देखील झाले. परंतु नंतर परिस्थिती सुधारल्यावर रुग्ण हे घरी परत गेले. पुण्यात या आजराचे रुग्ण हे वाढले आहेत आणि हा काळजीचा विषय आहे. तसेच दगावलेल्या रुग्ण हा जर जीबीएस मुळे दगावला असेल तर काळजी घ्यावी लागेल.’’
ते पुढे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी काही मोफत उपचाराची घोषणा केली त्याच उद्देश फक्त एवढंच आहे की जे गरीब रुग्ण आहे त्यांना महापालिकेच्या माध्यमातून उपचार मिळाले पाहिजे.तसेच रुग्णांसाठी आर्थिक निधीची तरतूद केली जात असून या रुग्णांना उपचार मिळणार असल्याचं यावेळी आबिटकर म्हणाले.
यावेळी नांदेड गावातील गावकरी म्हणाले की जेव्हा पासून आमचं गाव महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे तेव्हा पासून आम्हाला पाण्याची समस्या असून असच पाणी हे आम्हाला प्यायाव लागत आहे.कोणतेही काम महापालिकेच्या माध्यमातून होत नाहीये.महापालिका लक्ष देत नसल्याचं यावेळी या नागरिकांनी सांगितले.
गुइलेन बॅरी सिंड्रोमची धोक्याची घंटा; केंद्राचे आरोग्य पथक पुण्यात दाखल
गेल्या काही दिवासांपासून पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमने थैमान घातले आहे. आतापर्यंत पुण्यात 111 रुग्णांची नोंद करण्यात आली असून सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये दोन दोन रूग्ण आढळून आले आहेत. यासोबत नागपूरमध्येही 6 जणांना जीबीएसची लागण झाली आहे. राज्यातील वाढत्या जीबीएस रुग्णांची संख्या पाहता राज्यासह केंद्र सरकारची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. केंद्र सरकारनेही जीबीएसवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारकडून जीबीएस आजारासंदर्भात केंद्रीय आरोग्य यंत्रणांचे पथक नियुक्त केले असून हे पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे.
हेही वाचा: Pune GBS Update: गुइलेन बॅरी सिंड्रोमची धोक्याची घंटा; केंद्राचे आरोग्य पथक पुण्यात दाखल
गुलेन-बॅरे सिंड्रोमच्या (GBS) वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तज्ज्ञांचे पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. या पथकात विविध क्षेत्रांतील सात तज्ज्ञांचा समावेश असून, त्यामध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), दिल्ली, निमहान्स, बेंगळुरू, प्रादेशिक आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालय, तसेच पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) च्या तज्ज्ञांचा समावेश आहे.