Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

शांत शहरातील गजबजलेला फर्ग्युसन कॉलेज रोड, वर्दळीचा कॅम्पमधील एम. जी. रोड आणि विश्रांतवाडीतील उच्चभ्रू आर अँड डी ई परिसर मोठ्या थराराने गाजला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 04, 2025 | 11:44 AM
पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शांत शहरातील गजबजलेला फर्ग्युसन कॉलेज रोड, वर्दळीचा कॅम्पमधील एम. जी. रोड आणि विश्रांतवाडीतील उच्चभ्रू आर अँड डी ई परिसर मोठ्या थराराने गाजला. अंगावर शहारे आणणारा हा सर्व थरार नागरिकांनी डोळ्यात साठवला. पण, भितीने काही काळ हृदयाचा ठोका चुकवलेला हा प्रसंग एक मॉकड्रिल असल्याचे समजल्यानंतर त्यांनी नि:श्वास सोडला. या ड्रिलमध्ये सुरक्षा दल, विमान हायजॅक व नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (एनएसजी), केंद्रीय दल आणि स्थानिक पोलिसांचा सहभाग होता.

कोणत्याही क्षणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची जाणीव ठेवून देशातील महत्वाच्या शहरात हा सराव आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार पुण्यातील फर्ग्युसन रोडवर गर्दीच्या मध्यभागी, तसेच एम. जी. रोड येथे बॉम्बस्फोटाचा प्रसंग दाखविण्यात आला. तर, विश्रांतवाडीतील आर अँड डी ई येथील शास्त्रज्ञांना बंदी बनवण्यात आले. सायंकाळी विमानतळावर एक विमान हायजॅक करून त्यातील प्रवाशांना ओलीस धरण्यात आले. या चारही ठिकाणी पोलिस व आपत्कालीन यंत्रणा तातडीने दाखल झाल्या. घटनास्थळ बंदिस्त करून संशयितांना ताब्यात घेणे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, जखमींना मदत पोहोचविणे अशी शृंखलाबद्ध कारवाई प्रत्यक्ष राबविण्यात आली.

दरम्यान, या घटनांची पूर्वकल्पना नसल्याने नागरिक गोंधळले; मात्र लगेच हा सुरक्षा सराव असल्याचे समजताच अनेकांनी कुतूहलाने मॉकड्रिल पाहण्यासाठी गर्दी केली. काही ठिकाणी वाहतूक थोडा वेळ विस्कळीत झाली होती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्यासह विविध झोनमधील उपायुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम केले.

‘रिस्पॉन्स टाईम’ची नोंद 

आपत्कालीन प्रसंग घडल्यास पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा किती वेळात घटनास्थळी पोहोचतात व मदतकार्य सुरू करतात, याचा अभ्यास करण्यात आला. स्थानिक पोलिसांसह विविध यंत्रणांना दाखल होण्यासाठी लागलेल्या रिस्पॉन्स टाईमची नोंद याध्यमातून घेण्यात आली. प्रत्येक टप्प्यातील वेळेची नोंद घेऊन यंत्रणांमधील समन्वयाची चाचणीही करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : 500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं

Web Title: A mock drill in pune caused chaos among citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • Mock Drill
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर
2

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
3

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर
4

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.