crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे: श्रावणी सोमवारनिमित्त खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. भाविकांना घेऊन पिकअप वाहन घाटातून जात असतांना खोल दरीत कोसळली. या भीषण अपघात 10 महिलांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
क्रिकेट खेळण्यावरून झाला वाद; व्यापाऱ्याला बेदम मारहाण करून हातपाय तोडले अन् मुलांनाही…
श्रावण महिन्याच्या श्रावणी सोमवारनिमित्त पाइंटजवळील पापळवाडी येथून 35 महिला आणि दोन लहान मुले अशी एकूण ३७ जण अपघात झालेल्या पिकअप वाहनातहोते. ते कुंडेश्वर येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी जात होती. मात्र घाटाच्या पहिल्याच वळणावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन पाच ते सहा पलटी खात खोल दरीत कोसळले. हा अपघात होण्याआधी या महिला वाहनात उत्साहात विठ्ठलाची गाणी म्हणत होते. या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटे पूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे.
शेवटचा व्हिडीओ समोर
या दुर्दैवी घटनेच्या काही मिनटे आधीचा व्हिडीओ समोर आला आहे. पिकअपमध्ये महिला हसत, बोलत आणि गाणी म्हणत होत्या. अगदी भक्तीमय वातावरणात कुंडेश्वराच्या दर्शनासाठी या महिला जात होत्या. हा आनंदमय प्रवास विठ्ठलाचे गाणी म्हणत निघालेल्या महिलांसाठी शेवटचा क्षण ठरला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील शिव कुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाताना पिकअपचा अपघात झाला, त्या अपघातापूर्वी शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे, देवाचं नामस्मरण आणि भजनं म्हणत हसत-खेळत या महिला प्रवास करत होत्या.#Punenews #Accidentnews #Video pic.twitter.com/ltkXOv3u0a
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) August 12, 2025
चालकाला अटक
या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आली आहे. चालकाचे नाव हृषीकेश करंडे असे आहे. हृषीकेशवरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोबतच जखमी 30 महिला आणि लहानग्यांच्या जीव धोक्यात आणला. तीव्र चढाई असल्याची कल्पना असताना दुसऱ्यांचा जीवास कारणीभूत ठरेल अशी अवैध वाहतूक, निष्काळजीपणे वाहतूक करणे, अशा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीचं त्याला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे.
अपघातात मृत महिलांची नावं
शोभा ज्ञानेश्वर पापळ (27), सुमन काळूराम पापळ(40), शारदा रामदास चोरगे (45), मंदा कानिफ दरेकर (55), संजीवनी कैलास दरेकर (55), मिराबाई संभाजी चोरगे (55), बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर (50), शकुंतला तानाजी चोरघे (50), पार्वताबाई दत्तू पापळ (60), फसाबाई प्रभू सावंत (62), सर्व रा. पापळवाडी, पाईट, ता, खेड. या दुर्दैवी अपघातस्थळावर जागोजागी फुटलेल्या बांगड्यांचा खच, चपलांचा ढीग दिसून येत होता. सोबत आलेल्या आपल्या जीवाभावाच्या महिलांचे मृतदेह पाहून महिलांना अश्रू अनावर झाले.
दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं; भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एकाची निर्घृण हत्या, एकजण गंभीर जखमी