
crime (फोटो सौजन्य: social media)
फिर्यादी हे एका विकासकाकडे गेले तीन वर्षापासून काम करत आहेत. विकासक यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट इन्फंस एरिया (नैना) येथे टीटीएस क्रमांक 1 मध्ये भूखंड क्रमांक 27 खरेदी केला आहे. या भूखंडाच्या मोजणी व इतर प्रशासकीय कामांच्या अनुषंगाने अर्ज व इतर आर्थिक व्यवहार संबंधित काम तक्रारदार पाहतात. तक्रारदार यांनी सदरचा भूखंड मोजणीसाठी विकासकाच्या नावे नैना कार्यालयात अर्ज दिला होता. त्या अर्जानुसार 3 डिसेंबर रोजी भूखंड मोजणी होणार असल्याचे नैना कार्यालयातील सांगण्यात आलं होतं. भूखंडाची मोजणी झाल्यावर मोजणीच्या रिपोर्टसाठी निमतानदार शेख यांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून, ‘क पत्र’ देण्यासाठी भूमीलेखचे उपअधीक्षक दिलीप बागुले यांच्याशी संपर्क साधून दिला असता, बागुले यांनी फिर्यादी यांच्याकडे प्रथम 9 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 6 लाख रुपये देण्याचे कबूल झाल्यावर, शेख यांनी सीबीडी मध्ये फिर्यादी यांच्या गाडीत 6 लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध पक्षाने रंगेहात पकडले आहे. यामध्ये दिलीप तुळशीराम बागुल, वय 55 वर्ष, राहणार बदलापूर व कमिलोद्दीन रियाजुद्दीन शेख, वय 27 वर्ष, राहणार कामोठे, या दोघांना अटक करून दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: उपअधीक्षक दिलीप बागुले व निमतानदार कलिमुद्दीन शेख.
Ans: भूखंड मोजणी अहवाल व ‘क पत्र’ देण्यासाठी.
Ans: चलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB).