Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh: लघुशंकेसाठी बसमधून उतरलेल्या प्रवाश्यांना टँकरने चिरडलं; 6 जणांचा मृत्यू, तर…

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना एक्सप्रेसवेवर टँकरच्या धडकेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. लघुशंकेसाठी उतरलेल्या प्रवाशांवर भरधाव टँकर चढल्याने भीषण अपघात घडला. पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 08, 2026 | 12:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मथुरातील यमुना एक्सप्रेसवेवर पहाटे भीषण अपघात
  • टँकरने चिरडल्याने 6 जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
  • लघुशंकेसाठी उतरलेल्या प्रवाशांवर भरधाव वाहनाची धडक
  • पोलिसांकडून चालकाविरोधात कारवाई व तपास सुरू
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव वेगाने आलेल्या टँकरने चिरडल्याने हि हृदयद्रावक घटना घडली. अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात सुरीर कोतवाली हद्दीतील माईलस्टोन क्रमांक ८८ जवळ झाला.

गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर थेट तडीपारीची कारवाई

पोलिसांनी काय दिली माहिती?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून कानपुर देहातकडे जाणारी खासगी बस यमुना एक्सप्रेसवेवरून प्रवास करत होती. त्यावेळी माईलस्टोन 88 जवळ काही वेळासाठी बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली. बस थांबताच त्यातील काही प्रवासी लघुशंकेसाठी खाली उतरले. प्रवासी रस्त्याच्या कडेला उभे असतानाच समोरून अतिवेगाने येणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अनेक जण हवेत उडून दूर फेकले गेले. काही प्रवासी जागीच कोसळले, तर काही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून राहिले.

प्रवाशांच्या किंकाळ्या, मदतीसाठीचे आक्रोश आणि भीतीचे वातावरण घटनास्थळी पसरले. या अपघातामुळे काही काळ यमुना एक्सप्रेसवेवरील वाहतूकही विस्कळीत झाली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, एक्सप्रेसवेची मदत व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पथकाने जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ६ जणांना मृत घोषित केले. एका जखमी व्यक्तीची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. मृतांमध्ये चार जण एकाच कुटुंबातील असल्याचे देखील समोर आले आहे. या घटनेने त्यांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे. मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार आर्थिक मदत देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. पोलिसांनी संबंधित टँकर ताब्यात घेतला असून चालकाची ओळख पटवून त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहे.

Bihar Crime: चार मित्रांनी एकत्र घेतलं उचललं टोकाचं पाऊल; एकाच कंपनीत करायचे नोकरी; काय घडलं नेमकं ?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात नेमका कुठे घडला?

    Ans: मथुरा जिल्ह्यातील यमुना एक्सप्रेसवेवर, माईलस्टोन क्रमांक 88 जवळ.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या भीषण धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: अपघाताचे प्राथमिक कारण काय?

    Ans: टँकर चालकाचा बेदरकार वेग आणि निष्काळजीपणा हे कारण मानले जात आहे.

Web Title: Uttar pradesh passengers who got off the bus to urinate were run over by a tanker 6 people died and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.