Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् होत्याचं नव्हतं झालं; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील धक्कादायक घटना

शुक्रवारी पहाटे भरधाव ट्रक एका वाहनावर आदळून ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात ट्रकमधील दोन क्लिनर जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 15, 2026 | 04:22 PM
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् होत्याचं नव्हतं झालं; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील धक्कादायक घटना

ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् होत्याचं नव्हतं झालं; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:
  • ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् होत्याचं नव्हतं झालं
  • मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील धक्कादायक घटना
  • एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नवले पूल परिसरात सिग्नलवरील वाहनांना उडवून एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघात झाला असून, शुक्रवारी पहाटे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रक एका वाहनावर आदळून ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात ट्रकमधील दोन क्लिनर जखमी झाले आहेत.

 

नासीर मोहम्मद शाह मोहम्मद चौधरी (वय ३६, सध्या रा. कुदळवाडी, मोशी रस्ता, चिखली, मूळ रा. कलवारीनानकार, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. अपघातात ट्रकमधील मदतनीस अर्जुनकुमार मौर्या (वय २४, सध्या रा. मोरे चौक, अशोक काॅलनी, चिखली) याच्यासह आणखी एक जण जखमी झाला आहे. याबाबत मौर्या याने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रकचालक नासीर चौधरी हा शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन भरधाव निघाला होता. जांभुळवाडीत भरधाव ट्रकचालक चौधरीचे नियंत्रण सुटले आणि तो एका वाहनावर आदळला. त्याचा वेग इतका होता की, अपघातात ट्रकच्या केबीनचा चुराडा झाला. त्यात चालक चौधरीसह क्लिनर मौर्या आणि आणखी एक जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढली. गंभीर जखमी झालेल्या चैाधरी याच्यासह तिघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच चौधरी याचा मृत्यू झाला होता. उपनिरीक्षक मारुती वाघमारे अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला! नेपाळमध्ये भारतीय भाविकांची बस दरीत कोसळली; ७ पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी

अवजड वाहनांनी शाळकरी मुलासह वृद्धाला चिरडले

मोबाईलवर बोलत चाललेल्या सिमेंट मिक्सर चालकाच्या बेदरकारपणामुळे मिक्सरची धडक बसून झालेल्या अपघातात सायकलस्वार शाळकरी मुलाचा बळी गेला आहे. ही घटना चिंचवड येथे एसकेएफ कंपनीजवळ गुरूवारी (दि. १२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. तर, बुधवारी (दि. ११) रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे – आळंदी पालखी मार्गावर बोपखेल येथे ट्रेलरच्या धडकेत ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यु झाला आहे. या घटनांनी अवजड वाहनांमुळे निर्माण होणारी उद्योगनगरीतील अपघातांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. भरधाव ट्रक, डंपर, मिक्सर आणि कंटेनरमुळे दुचाकीसह इतर वाहनचालकांना आणि पादचार्‍यांना कायमच जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये-जा करावी लागत आहे.

Web Title: A shocking accident has occurred on the mumbai bangalore bypass

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • pune news

संबंधित बातम्या

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
1

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
2

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
3

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
4

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.