केअर टेकरकने मनोरुग्ण महिलेवर केला अत्याचार; पुण्यातील संतापजनक प्रकार
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराने मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कामगाराला अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी ३४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ३८ वर्षीय पीडित महिला मनोरुग्ण आहे. आरोपीला केअरटेकर म्हणून ठेवले होते. त्याने मनोरुग्ण महिलेला धमकावून त्याने तिच्यावर अत्याचार केला. ३ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान त्याने महिलेला धमकावून वेळोवेळी अत्याचार केला. महिला मनोरुग्ण असल्याने सुरुवातीला तिने घटनेची माहिती दिली नाही. अखेर तिने याबाबतची तक्रार दिली. नंतर आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : ‘मोक्का’तील गुंडाची पुण्यात दहशत, हॉटेलची तोडफोड; चालकाकडे मागितली खंडणी
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
अल्पवयीन मुलीची छेड
गेल्या काही दिवसाखाली सोलापूर जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. बारामती ते इंदापूरमार्गे बार्शीकडे निघालेल्या बसमध्ये प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीला एका अनोळखी युवकाने त्याचे मोबाइलमधील पॉर्न व्हिडिओ दाखवून अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची फिर्याद अल्पवयीन मुलीने बार्शी शहर पोलिसात दिली आहे. रमेश सुब्राव बनसोडे (रा. भीमनगर, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.