Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PUNE NEWS : कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्यावर महापौरांची अधिकाऱ्यांना तंबी; आश्वासनांऐवजी कृतीची मागणी

पिंपरी शहरात कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारीं वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रवी लांडगे यांनी मंगळवारी महापालिकेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 20, 2026 | 08:18 PM
PUNE NEWS: Mayor warns officials over low pressure and contaminated water supply; Demands action instead of promises

PUNE NEWS: Mayor warns officials over low pressure and contaminated water supply; Demands action instead of promises

Follow Us
Follow Us:

पिंपरी : शहरात कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर रवी लांडगे यांनी मंगळवारी महापालिकेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. “फक्त आश्वासने देऊन चालणार नाही; नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पाणी देण्यासाठी ठोस काम करा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा : ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल ‘इतके’ बिबटे जेरबंद

पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता अनेक भागांत टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आंद्रा व भामा आसखेड पाणी योजनांची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले. सध्या आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीमार्गे उचलले जात असले तरी संबंधित कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण झालेली नसल्याची बाब बैठकीत समोर आली. यासंदर्भात सविस्तर माहिती घेत महापौरांनी कामात गती आणण्याचे निर्देश दिले. आवश्यक असल्यास नवीन ठेकेदार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दरम्यान, शहरातील दीर्घकालीन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेला मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याने त्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच राज्य सरकारकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापौर लांडगे यांनी सांगितले.

हेही वाचा : Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड

बैठकीत पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्ती, गळती रोखणे व वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याबाबतही चर्चा झाली. नागरिकांना नियमित, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा हा महापालिकेचा प्राधान्यक्रम असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

Web Title: Pune news mayor warns officials over low pressure and contaminated water supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • PCMC News
  • pune news
  • water pollution

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
2

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
3

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…
4

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.