Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक लोकप्रतिनिधी आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 20, 2026 | 06:57 PM
"शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार...", किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

"शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार...", किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Follow Us
Follow Us:

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोन्याचा पाळणा जोजवण्यात आला आणि पुष्पवृष्टी करून शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते. यावेळ, ज्या विचारांवर आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द मी या पवित्र भूमीवर शिवजयंतीच्या दिवशी मी तुम्हाला देते. अशी ग्वाही नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

Palghar District News: राज्यात महसूल प्रशासनाचा मोठा विस्तार! पालघर, वसई, डहाणूत नवे महसूल केंद्र; नागरिकांचा वेळ व प्रवास वाचणार

राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांचे पहिलेच भाषण किल्ले शिवनेरीवर झाले. या भाषणातून सुनेत्रा पवार यांनी महामानवांच्या पुरोगामी विचारांचा वारसा अजित पवार यांनी जपला त्याच वाटेवर या पुढे वाटचाल करणार असल्याचे म्हटले.

पहिल्या भाषणातच विचारधारेवरील निष्ठा व्यक्त !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सत्तेत असला तरी अजित पवार यांनी विचारधारेशी कोणतीही तडजोड केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि भूमिका ते नेहमी ठामपणे मांडत असत. त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार यांनी देखील शिवजयंती कार्यक्रमाच्या पहिल्या वहिल्या भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचे भाषण झाले. यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत, पुरोगामी विचारांशी बांधिलकी त्यांनी व्यक्त केली.

महायुतीतील राष्ट्रवादीचा पुरोगामी विचार !

दिवंगत अजित पवार यांनी महायुतीत सत्तेत असलो तरी विचारांशी कोणतीही तडजोड नाही, हे अनेकदा विचार आणि कृतीतून दाखवून  दिले होते. आता अजित पवार नंतर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाऱधारेची दिशा कोणती असेल हे सुनेत्रा पवार यांनी अधोरेखीत केले आहे. ज्या कठीण परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्याकडे सुत्रे आली आहेत, अशा कठीण काळात देखील त्या सत्तेतील त्यांची भूमिका आणि पक्षाची विचारधारा ठामपणे पुढे नेतील अशी सुचक भूमिका त्यांच्या भाषणातून दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

मुंबई विभाग दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

Web Title: Deputy chief minister sunetra pawar assurance at shivneri fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • maharashtra
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.