Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…

राजगुरूनगर शहराजवळील शिरोली येथे अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा धारदार हत्याराने गळा चिरून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2025 | 01:40 PM
पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास...

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास...

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या
  • पुणे जिल्ह्यात महिलेचा गळा चिरून खून
  • धक्कादायक कारणही आलं समोर
राजगुरूनगर : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार, हाणामाऱ्या यासारख्या घटना घडत आहेत. पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजगुरूनगर शहराजवळील शिरोली येथे अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा धारदार हत्याराने गळा चिरून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून, खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव रूपाली विलास वाडेकर (वय ४६, मुळ रा. कल्याण, जि. ठाणे, सध्या रा. शिरोली, ता. खेड) असे आहे. संबधीत महिला मूळची ठाणे जिल्ह्यातील रहीवासी असून, गेल्या काही दिवसांपासून ती शिरोली येथे प्रियकराच्या घरी राहण्यास होती. संशयित आरोपी ललित दिपक खोल्लम (वय ३७, रा. शिंदेवस्ती, शिरोली, ता. खेड) याच्याशी रूपालीचे अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. त्याच रागातून ललितने रूपालीचा गळा चिरून खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शिरोली येथील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत दोघांमधील भांडणाचे आवाज आल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले; मात्र नंतर साडेअकरा वाजता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. खेड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुदर्शन सुखदेव माताडे यांनी याबाबत फिर्याद दिली असून, संशयीत ललित खोल्लम याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयीत आरोपी यापुर्वी काही वर्ष एका गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्यापुर्वी ठाण्यात असताना दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. महिलेच्या पतीचे निधन झाले असल्याने ती नातेवाईकांकडे शिरोली येथे राहायला होती, असे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत, संशयीत आरोपी खोल्लम हा घटनेनंतर फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Web Title: A shocking incident of murder of a woman has taken place in rajgurunagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा
1

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई
2

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
3

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला
4

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.