Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

सकाळी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या विरेंद्र द्विवेदी या 42 वर्षीय आयटी अभियंत्याचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 19 वर्षीय तरुणाने चालवलेल्या कारने द्विवेदी यांना जोरात धडक दिल्याची माहिती आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 12, 2026 | 06:50 PM
पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या असून, दररोज अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. सकाळी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या विरेंद्र द्विवेदी या 42 वर्षीय आयटी अभियंत्याचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 19 वर्षीय तरुणाने चालवलेल्या कारने द्विवेदी यांना जोरात धडक दिल्याची माहिती आहे.

या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी धडक देणारी इनोव्हा कार जप्त केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. विरेंद्र द्विवेदी हे दररोज सकाळी पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी जॉगिंगसाठी जात होते. शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेने धावत असताना एका अत्यंत वेगात आलेल्या इनोव्हा कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, द्विवेदी हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर त्यांना तातडीने त्याच कारमधून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कारबाबत मोठी माहिती समोर

अपघाताची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली इनोव्हा कार जप्त केली आहे. ही कार पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या कंपनीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. या अपघातात कारचा वेग किती होता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण का सुटले, तसेच चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक

दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, चतु:शृंगी पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याशिवाय, संशयित चालकाची वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलिसांचा अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण आणि कार चालवणाऱ्या व्यक्तीची अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

Web Title: A software engineer died after being hit by a speeding car in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
1

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
2

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
3

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश
4

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.