Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक; पाच जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी

एका चारचाकी वाहनाने प्रवासी जळगावकडून नागपूरकडे येत होते. महामार्गावर मलकापूर तालुक्यातील चिखली-रमथमनजीक चारचाकीने समोरील ट्रेलरला जबर धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात घडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 19, 2025 | 08:39 AM
भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक; पाच जणांचा मृत्यू, चौघे जखमी

भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक; पाच जणांचा मृत्यू, चौघे जखमी

Follow Us
Close
Follow Us:

मलकापूर : भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वर चिखली-रमथमनजीक घडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आले.

एका चारचाकी वाहनाने प्रवासी जळगावकडून नागपूरकडे येत होते. महामार्गावर मलकापूर तालुक्यातील चिखली-रमथमनजीक चारचाकीने समोरील ट्रेलरला जबर धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच, एमआयडीसी पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत व गंभीर जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. त्यात गंभीर जखमी असलेल्या चार जणांना जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. तर एकाला बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.

दरम्यान, अपघात घडल्यानंतर पोलिसांनी महामार्गावर ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले आदींनी घटनास्थळी व उपजिल्हा रूग्णालयात भेट दिली.

हेदेखील वाचा : Nanded Accident: ट्रकचा ब्रेक फेल, काळी-पिवळीची पलटी आणि दुचाकींचा चेंदामेदा; 8 जण जखमी, तर…

पाच जणांचा अपघातात मृत्यू

मृतांमध्ये कारचालक साजीद अजीज बागवान (वय ३०, रा. भुसावळ, जि. जळगाव, खान्देश) व संतोष तेजराव महाले (वय ४०, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव), मृत महिला तानिया साजिद बागवान (वय २८, रा. भुसावळ) व झूमा सिकंदर (वय ४८, रा. भुसावळ, मूळ गाव नादिया, पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. तर उर्वरित आणखी एका मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

मृत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. या अपघातात जखमी पंकज दिलीप गोपाळ (२२. रा. नांद्रा हवेली, ता. जामनेर, जि. जळगाव). दीपिका विश्वास (३०, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) टीना अंदाजे अजय पाटील (४५, रा. भुसावळ) व एक अनोळखी महिला यांचा समावेश आहे. या घटनेबाबत अक्षय भास्कर सोनवणे (२२, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून आरोपी मृत चालक साजिद बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : दुचाकीवरुन घरी जाताना डम्परने विद्यार्थिनीला उडवले; ग्रामस्थांनी वाहन चालकासह मुरुम माफियाला दिला चोप

Web Title: A speeding car hit a trailer hard 5 people died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • Accident News

संबंधित बातम्या

दुचाकीवरुन घरी जाताना डम्परने विद्यार्थिनीला उडवले; ग्रामस्थांनी वाहन चालकासह मुरुम माफियाला दिला चोप
1

दुचाकीवरुन घरी जाताना डम्परने विद्यार्थिनीला उडवले; ग्रामस्थांनी वाहन चालकासह मुरुम माफियाला दिला चोप

माकडाने चालत्या दुचाकीवर उडी मारली अन्…; महाबळेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना
2

माकडाने चालत्या दुचाकीवर उडी मारली अन्…; महाबळेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना
3

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

Pune Gramin News : पुणे ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढले; वाचा धक्कादायक आकडेवारी
4

Pune Gramin News : पुणे ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढले; वाचा धक्कादायक आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.