धारदार शस्त्राने तरुणाचा खून
अकोल्यातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामध्ये दारूच्या वादातून काकानेच आपल्या पुतण्याची दगडाने ठेचून हत्या केली आहे. कुणाल किशोर कमलाकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जास्त प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता. त्यातूनच झालेल्या वादातून काकाने कुणालची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अखेर निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक, कसा पोहोचला नेपाळ?
पुढे आलेल्या माहितीनुसार, सुनील कमलाकर असं मारेकरी काकाचं नाव आहे. कुणाल बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलिसांनी ठाण्यात ४ दिवसापूर्वी दाखल होती. मात्र तयानंतर अकोल्यातील पेन्शनपुरा भागात काकाच्याच घरात कुणालचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तपासादरम्यान काकानेच पुतण्याची ही हत्या केल्याचं उघड झालंय. या प्रकरणात खदान पोलिसांनी आरोपी सुनील कमलाकर याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात खदान पोलीस अधिक तपास करतायेत.
पालघर हादरलं! केळवेतील रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार
पालघरच्या केळवे येथील एका रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत अल्पवयीन मुलगी तेजल शिवराम भिडे ही जखमी झाली आहे. पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारानंतर जखमी मुलीवर बोईसर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बंदूक दाखवतांना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.
पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. नेमका कसा हा प्रकार घडला? याची माहिती पोलिस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बंदूक दाखवताना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची माहिती देण्यात आली आहे. पण हेच नेमकं कारण आहे की आणखी काही वेगळा प्रकार आहे, यासंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.