गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील जाखोत्रा गावात घडलेली एक घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. एका अर्धवट जळालेल्या वृद्धाचा मृतदेह सापडल्याने प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बनले होते. मृत व्यक्ती दलित समाजातील असल्याने जातीय तणाव निर्माण होण्याची भीती होती. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासानंतर जी वस्तुस्थिती समोर आली, ती चकित करणारी होती.
पालघर हादरलं! केळवेतील रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार
नेमकं काय प्रकरण?
27 मे रोजी सकाळी जाखोत्रा गावात एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. तो मृतदेह नारंगी व जांभळ्या रंगाच्या घाघरा-चोलीत होता आणि पायात चांदीचे पैजण होते. या वेशभूषेमुळे लोकांना वाटले की ही कुठली तरी स्त्री आहे, विशेषतः गीता नावाच्या एका तरुणीचा मृतदेह असल्याचा संशय उपस्थित झाला. गीताची गैरहजेरी आणि कपड्यांची जुळती माहिती यामुळे तिच्या कुटुंबाला वाटलं की गीताने आत्महत्या केली आहे.
पोलिसांचा तपास आणि उलगडा
पोस्टमॉर्टम अहवाल आणि ओळखीच्या तपासणीदरम्यान, हे स्पष्ट झाले की मृतदेह 56 वर्षीय दलित मजूर हरजी देभा सोलंकी यांचा आहे. ते वौवा गावात राहत होते, जे जाखोत्रा गावापासून सुमारे 7 किमी अंतरावर आहे.
प्रेमसंबंध आणि खुनाचा कट
गीताची ओळख 23 वर्षीय तरुणी म्हणून झाली असून, ती आधीपासूनच विवाहित आहे. तिच्या पतीचं नाव सुरेश गेंगा भीमा असून, त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. गीता गावातील भरत लुभा अहिर नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंधात होती. दोघांनी मिळून जोधपूरला पळून जाण्याचा निर्णय घेतला. गीताने असा डाव आखला की तिने आपला मृत्यू दाखवून गावातून फरार व्हायचं ठरवलं. त्या योजनेंतर्गत, तिने आणि भरतने हरजी सोलंकी यांना दारू पाजून बेशुद्ध केलं. त्यानंतर त्यांना घाघरा-चोली घालवून जाळलं, जेणेकरून लोकांना वाटावं की गीता मरण पावली आहे.
दुसऱ्याच दिवशी अटक
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 28 मे रोजी पहाटे 4 वाजता, पोलिसांनी गीता आणि भरतला पालनपूर रेल्वे स्थानकावरून अटक केली. ते दोघं जोधपूरला जाणाऱ्या ट्रेनची वाट बघत होते. पोलिसांनी दोघांकडून चौकशी केली आणि संपूर्ण कटाची कबुली मिळवली.
मृतकाचे नाव हरजी देभा सोलंकी (56), दलित मजूर असे आहे. मृत व्यक्ती दलित समाजातील असल्याने, प्रारंभी ही घटना जातीय हिंसाचारासारखी वाटली होती. त्यामुळे स्थानिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, तपासानंतर जे सत्य समोर आलं, त्यातून ही घटना प्रेमसंबंध, फसवणूक आणि खुनाचा कट असल्याचं सिद्ध झालं.
अखेर निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक, कसा पोहोचला नेपाळ?