Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: धक्कादायक! विद्येच्या मंदिरात शिक्षकच ठरला भक्षक; विद्यार्थिनीची छेड काढली अन्…

Crime Marathi News: या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, शाळेतील इतर विद्यार्थ्यांकडूनही घटनेची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 01, 2025 | 07:09 PM
Kolhapur Crime: धक्कादायक! विद्येच्या मंदिरात शिक्षकच ठरला भक्षक; विद्यार्थिनीची छेड काढली अन्...

Kolhapur Crime: धक्कादायक! विद्येच्या मंदिरात शिक्षकच ठरला भक्षक; विद्यार्थिनीची छेड काढली अन्...

Follow Us
Close
Follow Us:
कोल्हापूर:  कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका शाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नसीर मुल्ला असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप आहे.

ही बाब समजताच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेवर धडक दिली. त्यांनी संतप्त होत शिक्षकाला शाळेच्या आवारातच चोप दिला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार हसन मुश्रीफ यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी संबंधित शिक्षकाला तत्काळ अटक करा, असे आदेश दिले आहेत. यानंतर स्थानिक प्रशासनानेही तातडीने हालचाल करत शिक्षक नसीर मुल्ला याचे निलंबन केले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, शाळेतील इतर विद्यार्थ्यांकडूनही घटनेची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बालकांचे संरक्षण आणि शाळेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पालकांनी शाळा प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
महाराष्ट्रात एक अतिशय क्रूर आणि लज्जास्पद घटना घडली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातून या घटनेचा संताप व्यक्त होत आहे. एवढेच नाही तर काही वारकऱ्यांना अडवून लुटल्याचा प्रकारही समोर आला आहे. सध्या राज्यात वारक्यांची पावले लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पुढे पुढे सरकत आहे. अशातच वारीत जाणाऱ्या एका मुलीसोबत गैरकृत्य घडल्याने महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडली आहे.

Pandharpur Crime : वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरकडे जाणारे दोन वारकरी वाटेच चहासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांच्या जवळ दुचाकीवरून दोन जण आले आणि थांबले.धाकदडपशाही करुन त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला, यानंतर संशयित लुटारुंनी दोन वारकऱ्यांना लुबाडले. यानंतर ते पुढे निघाले. त्यानंतर त्यांनी एका अल्पवयीन मुलीला गाठले. या मुलीला त्यांनी काही अंतर दूर नेत एका ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून, दौंड परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या काही भाविकांना तुम्हाला देवाच्या टोकन दर्शनाचे पास 100 रुपयात देतो, असे सांगून सासवड परिसरात जुन्या पासावर हे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, तेव्हा प्रवेशद्वारावर स्कॅनिंग करताना ते पास बोगस असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: A teacher molested a student in a school kolhapur crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 07:09 PM

Topics:  

  • crime news
  • kolhapur
  • Teacher

संबंधित बातम्या

Thane Crime :  गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या  गोळीबाराने ठाणे हादरलं
1

Thane Crime : गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबाराने ठाणे हादरलं

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर
2

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित
3

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित

महाभयानक! बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी; पोलिसांनी सापळा रचून केली 4 जणांना अटक
4

महाभयानक! बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी; पोलिसांनी सापळा रचून केली 4 जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.