Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन, पुण्यातील घटनेनं खळबळ; दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नीच्या आणि मेहुणीच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गोखलेनगर भागातील जनवाडी परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 10, 2026 | 12:30 AM
मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन, पुण्यातील घटनेनं खळबळ; दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन, पुण्यातील घटनेनं खळबळ; दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन
  • पुण्यातील घटनेनं खळबळ
  • दोघींविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : पत्नीच्या आणि मेहुणीच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गोखलेनगर भागातील जनवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह मेहुणीविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम अनिल जाधव (वय ३०, रा. पाच पांडव सोसायटी, जनवाडी जनता वसाहत) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

या प्रकरणी त्याची पत्नी रेवती रमेश गजमल ऊर्फ रेवती प्रेम जाधव (वय २५) आणि मेहुणी रितिका रमेश गजमल (वय ३०, रा. धर्मनगर, अरुण कदम चौक, जनवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रेम याची आई लक्ष्मी जाधव (रा. पाच पांडव सोसायटी, जनता वसाहत, जनवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम हा बेरोजगार होता. त्याच्यावर कर्जाचा डोंगर होता. त्यातूनच तो आधीच मानसिक तणावात होता. त्यात पत्नी आणि मेहुणी त्याला सतत मानसिक त्रास देत होत्या. किरकोळ कारणावरून त्याच्याशी वाद घातला जात होता, तसेच अपमानास्पद वागणूक दिली जात होती, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पत्नी आणि मेहुणीच्या त्रासामुळे मुलगा प्रेम याने ४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटना समजताच कुटुंबीयांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे जनवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नेमका त्रास कशा प्रकारचा होता, कर्जाचे कारण काय होते, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : संगमवाडीतील पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा, अन्यथा…; मनसेचा प्रशासनाला इशारा 

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणाने आत्महत्या का केली?

    Ans: पत्नी आणि मेहुणीच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून, तसेच बेरोजगारी व कर्जाच्या तणावामुळे प्रेम जाधव याने आत्महत्या केल्याचा आरोप आईने फिर्यादीत केला आहे.

  • Que: या प्रकरणात कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: मृत तरुणाची पत्नी रेवती प्रेम जाधव (वय २५) आणि मेहुणी रितिका रमेश गजमल (वय ३०) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल पाटील करत आहेत. पोलिसांकडून त्रासाचे नेमके कारण आणि कर्जाबाबत अधिक तपास सुरू आहे.

Web Title: An incident has occurred in pune where a young man died by suicide nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • suicide news

संबंधित बातम्या

ट्रकचालकाला बेदम मारहाण करून जीव घेतला; दोन आरोपींना न्यायालयाचा मोठा दणका
1

ट्रकचालकाला बेदम मारहाण करून जीव घेतला; दोन आरोपींना न्यायालयाचा मोठा दणका

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा
2

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा

Suicide News: “बाबांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून…” नालासोपाऱ्यातील वाकणपाड्यात खळबळ; ऐन दिवाळीत तरुणानं उचललं भयंकर पाऊल!
3

Suicide News: “बाबांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून…” नालासोपाऱ्यातील वाकणपाड्यात खळबळ; ऐन दिवाळीत तरुणानं उचललं भयंकर पाऊल!

बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा
4

बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.