लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य
वरूड : वरूड तिवसाघाट महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकमध्येच चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या रस्त्यावरील शर्मा पेट्रोलपंपजवळ (आरजे 42/जीए-0718) हा 18 चाकी ट्रक गेल्या दोन दिवसांपासून विनामाल अवस्थेत उभा होता. नंतर या ट्रकची चौकशी केली असताना चालकाने गळफास घेतल्याचे दिसून आले.
हेदेखील वाचा : 20 तासांत दुसरा एन्काऊंटर! दोन जवानांची रेल्वेतून फेकून हत्या, एक लाखाचे बक्षीस असलेला आरोपी चकमकीत ठार
ट्रकचा चालक पप्पू उर्फ सलाम उद्दीन इस्माईल खान (वय 46, रा. बडोशिया जि. नागोरा, राजस्थान) याने त्या ट्रकवरील वाहकाची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले. त्यानंतर तो दोन दिवसांपासून दारू पित होता. मंगळवारी (दि.24) सकाळी सातच्या सुमारास पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या ट्रकच्या वरच्या बाजूला त्याने दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा चालक गळफास घेतलेल्या अवस्थेत सकाळी 7 वाजताच्या सुमारास आढळून आल्याने पेट्रोलपंप परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली.
रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी काही वेळ घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. त्याचा मृतदेह उत्तरणीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक मालकाला माहिती दिली असता पांढुर्णा येथे उपस्थित असलेल्या ट्रकमालकाने वरूड गाठले व या घटनेची माहिती पप्पू उर्फ सलाम उद्दीन यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; नंतर जिवे मारण्याचीही दिली धमकी