एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार (File Photo : Crime)
खामगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. याच प्रकरणात या आधीही महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. याबाबत आरोपी व पीडित महिला हे एकाच ठिकाणी मजुरीचे काम करत होते. तिथे दोघांमध्येही प्रेमसंबंध जुळले. परंतु, नंतर मो. समीर याने फिर्यादीवर जबरीने अतिप्रसंग केले.
हेदेखील वाचा : गगनबावडा तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; सुमारे तीन तास पावसाची धुवाँधार बॅटिंग
त्याबाबत पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्यावेळेस ‘मी तुझ्यासोबत लग्न करतो, फिर्याद मागे घे’ असे आमिष दाखविल्याने महिलेने तक्रार मागे घेतली होती. नंतर 5 ते 6 महिने त्या महिलेसोबत राहून त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यानंतर त्या महिलेने लग्न करण्याबाबत वेळोवेळी म्हटले असता त्याने ‘तू आधी मुस्लीम धर्म स्वीकार कर, मग लग्न करतो’. असे म्हणत होता. परंतु धर्म परिवर्तन करणे स्वीकार नसल्याने महिला माहेरी तिच्या आईसोबत राहायला गेली.
दरम्यान, 13 सप्टेंबरच्या रात्री 11 वा पीडित महिला तिच्या मैत्रिणीच्या घरून येत असताना केडिया टर्निंगजवळील अर्जुन जल मंदिरसमोर आरोपीने तिला अडवून ‘तू माझ्या घरी आई वडिलांना, काकाला मी तुझ्यासोबत भेटतो, याबद्दल का बोलते’, असे बोलून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
त्याचप्रमाणे आरोपी समीरचे काका व आई यांनीसुद्धा पीडितेला समीरसोबतच तुझे लग्न लावून देतो, असे प्रलोभन दिले होते. अशा फिर्यादीवरून मो. समीर मो. नजीर, मो. नजीर, समीरचे काका खैरु, मो. समीरची आई (सर्व रा. जुना फैल, खामगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; जंगली महाराज रस्त्यावरुन महिलेचा मोबाइल हिसकावला