
crime (फोटो सौजन्य: social media)
सीआरपीएएफ कॉन्स्टेबलच्या घरात घडला प्रकार
जेव्हा १० वर्षाच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल, तेव्हा डॉक्टरांनी लीगल केस तयार केली. कारण तिच्या शरीरावर अनेक दिवसांपासून जखमा आढळून आल्या आहेत. तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल तेव्हा ती गंभीर अवस्थेत होती. मात्र त्या कॉन्स्टेबलने वेगळ कारण देत तिला घरी नेल. मात्र आता जेव्हा तिची प्रकृती बिघडली तेव्हा मात्र आता १२८ सेक्टर मधील मॅक्स रुग्णालयात भरती करण्यात आल आहे. ती मुलगी त्या कॉन्स्टेबलच्या घरी घरकाम करत होती. या घटनेने सगळ्यांना संताप होत आहे.
व्हेंटीलीटर वर देत आहेत झुंज
मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक वास्तव समोर आल आहे. ते म्हणजे मुलीचा शरीरात हिमोग्लोबिन हे फक्त १.९ टक्के इतकं आहे. तर तिच्या शरीरातील हाड तुटली आहेत. त्या कॉन्स्टेबलच तातडीने निलंबन करण्यात आल आहे. ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिथे उत्तर प्रदेश पोलिसांची एक टीम तैनात करण्यात आली आहे. १० वर्षाच्या चिमुकलीबरोबर अशा पद्धतीने वागणूक झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. किती वर्षापासून तिला त्रास दिला जात होता. तिच्या सोबत काय घडलं आहे? याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या घरी हे प्रकरण घडल्याने त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलीस तपास करून मेडिकल रिपोर्ट नुसार गुन्हा दाखल करणार आहेत. जर तिच्यावर शारीरिक अत्याचार झाला हे स्पष्ट झाल तर मग मात्र त्याला अटक होवू शकते. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेनं दिल्ली हादरून गेली आहे.
Gadchiroli Crime: बेपत्ता आरडी एजंटचा जंगलात निर्घृण अवस्थेत मृतदेह; हाताचे बोट छाटलेले….
Ans: दिल्लीतील एका सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या घरी ही घटना घडली आहे.
Ans: मुलगी गंभीर अवस्थेत असून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.
Ans: संबंधित सीआरपीएफ कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे.