
धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय राउत यांचे लग्न शितल जगदीश राउत (वय ३४, रा. पुणे) हिच्याशी ठरले होते. मात्र संबंधित महिला दुसऱ्या व्यक्तीसोबत गेल्याने हे लग्न झाले नाही. त्यानंतर धनंजय राउत यांचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न होऊन त्यांचा संसार सुरू होता. असे असतानाही मागील पाच वर्षांपासून शितल राउत ही धनंजय यांना वारंवार फोन करून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळूनच धनंजय राउत यांनी बेगडा शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मयताचे भाऊ विशाल तात्याराव राउत (३५ वर्षे, रा. एसटी कॉलनी, सांजा रोड, धाराशिव) यांनी १७ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरुद्ध कलम १०८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर मी…; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
गडहिंग्लज तालुक्यात दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे एका दहावीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना गेल्या काही दिवसाखाली घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. भैरू परशराम गवळी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. भैरु याने राहत्या घरात लाकडी तुळईला कापडी स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण हडलगे गावात हळहळ व्यक्त होत आहे. भैरू हा अभ्यासात सर्वसाधारण आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. दुपारच्या सुमारास घरात कोणाच्याही लक्षात न येता त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत भैरूचे वडील परशराम जोतिबा गवळी (वय 55, रा. गणेशपूर, गावठाण, सांबरे रोड, हडलगे) यांनी नेसरी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी तक्रार दिली आहे.