Sunil tatkare marathi news : छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवारी सुरेश धस हे परळी दौऱ्यावर होते. त्यापूर्वी त्यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आणि तेथील ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
प्रवासी व विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत. ही घटना परंडा तालुक्यातील सोनारी मधील हरणवड्याजवळ घडली. रोहकलहून परंड्याला जात असताना एसटी बसचा अपघात झाला.
महायुतीचे "ऑपरेशन टायगर" हे एक राजकीय रणनीती आहे, ज्यामध्ये विरोधी गटातील नेत्यांना फोडून सत्ताधारी गटात आणण्याचा प्रयत्न केला जातो. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदे गटात जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे
याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती दिली जात आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील भावी येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिवारात विहिरीचे पाणी देण्यावरून तुफान हाणामारीत तिघांचा बळी गेला आहे. ही घटना दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारात घडली.
तुळजापूर तालुक्यातील मेसाई गावाच्या जवळच्या एका गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
धाराशिव शहरातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील दुकाने निरिक्षक विवेक वासुदेव हेडाऊ यांना लाचखोरी प्रकरणी धाराशिवच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
मी अजून म्हातारा झालेलो नाही. सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे (शरद पवार घट) जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज धाराशिवमधील सभेतून भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांना दिला आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावे समोर येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील उमेदवार निश्चित केला आहे. कैलास पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे.
अहमदनगर शहरात सीना नदीवर झालेल्या अतिक्रमणामुळे मुसळधार पाऊस झाल्यावर नदीला पूर येत वस्त्यांमध्ये पाणी शिरतं.मात्र आता नदीची खोली आणि रुंदीकरणासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून विविध राजकीय विषयांवर जहरी निशाणा साधला जात आहे. आता कॉंग्रेसच्या एका माजी मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आमचं घरं फोडल्याचा गंभीर आरोप केला आहे.