Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! कोथरूडमध्ये भरदिवसा तरूणाचा खून; कारणही आलं समोर

कोथरूड भागातील शास्त्रीनगर येथे सागर कॉलनी परिसरात तरूणाचा चार अल्पवयीन मुलांनी पालघन सारख्या धारदार हत्यारांनी डोक्यात तसेच मानेवर व हातावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 31, 2025 | 04:30 PM
पुणे हादरलं! कोथरूडमध्ये भरदिवसा तरूणाचा खून; कारणही आलं समोर

पुणे हादरलं! कोथरूडमध्ये भरदिवसा तरूणाचा खून; कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कोथरूड भागातील शास्त्रीनगर येथे सागर कॉलनी परिसरात तरूणाचा चार अल्पवयीन मुलांनी पालघन सारख्या धारदार हत्यारांनी डोक्यात तसेच मानेवर व हातावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आशिष दशरत जाधव (वय ३५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरी करत होता. तर यातील एका अल्पवयीन मुलाची आई व आशिषची कामावर ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांच्यात मैत्री पूर्ण संबंध तयार झाले होते. दरम्यान आशिषने संबंधित महिलेला हात उसने पैसे देखील दिले होते. कालांतराने त्यांच्यात वादविवाद सुरू झाले. आशिष पैसेही परत मागत होता. त्यावरून तो शिवीगाळ करत असत.

दरम्यान गुरुवारी देखील त्यांच्यात वाद झाले होते. तेव्हा महिलेचा अल्पवयीन मुलगा देखील समोर होता. त्याने हा प्रकार पाहिला, त्यामुळे त्याला आशिषचा राग आला. सायंकाळी आशिष हा शास्त्रीनगर येथील सागर कॉलनी येथे आला होता. तो पार्क केलेल्या दुचाकीवर बसलेला होता. दरम्यान चार ते पाचजण हत्यारे घेऊन आले. त्यांनी बेसावध असताना त्याच्यावर धारदार हत्यारांनी वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आशिषचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते.

हे सुद्धा वाचा : प्रियकराने प्रेयसीच्या पतीचे वाहन पेट्रोल टाकून जाळले; पुण्यातील धक्कादायक घटना

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: A young man has been murdered in broad daylight in kothrud pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
1

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
2

आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला
3

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला

Zepto Illegal Vehicles: ‘४८ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन’; झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवरून युवासेनेचा इशारा
4

Zepto Illegal Vehicles: ‘४८ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन’; झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवरून युवासेनेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.