crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरीस लागलेल्या तरुणाने संस्थाचालकाने अपमानास्पद वागणूक दिल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना परळी तालुक्यातील नंदागवळ येथे घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव श्रीनाथ गोविंद गित्ते असे आहे. या प्रकरणात दोन संस्थाचालकांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय प्रकरण ?
आत्महत्या करणारे श्रीनाथचे वडील गोविंद गित्ते हे केज येथील साने गुरुजी आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०१० मध्ये त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर 2016 पासून गित्ते कुटुंब श्रीनाथ याला अनुकंपा तत्वावर नोकरीस घ्यावे अशी विनंती साने गुरुजी आश्रम शाळेच्या उद्धव कराड यांच्याकडे करत होते. परंतु त्याने गित्ते कुटुंबाची विनंती मान्य न करता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. यानंतर गित्ते कुटुंबाने प्रशासन दरबारी पाठपुरावा करत परळीत असलेल्या वसंत नगर तांडा येथील आश्रम शाळेत नोकरी मिळण्याबाबत ऑर्डर मिळवली.
वागणूक अतिरिक्त काम करण्यास भाग पडले
संस्थाचालक संजय राठोड यांनी देखील गित्ते कुटुंबाला त्रास दिला. तसेच श्रीनाथ याला अपमानास्पद वागणूक देत अतिरिक्त काम करण्यास भाग पाडले. या सर्व प्रकाराचा ताण सहन न झाल्याने श्रीनाथ याने दिनांक 22 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय राठोड व उद्धव कराड या दोन संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी ग्रामीण पोलिस करत आहेत. या घटनेनंतर परळी ग्रामीण पोलिसांनी संस्थाचालक संजय राठोड आणि उद्धव कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.स्थानिकांमध्ये या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन
माढ्यातील एका विवाहितेने टोकाचे पाऊल उचललं आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यानी तगादा लावल्यामुळे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दहीवली (ता. माढा) येथील पतीसह सासरे-सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. मयत विवाहितेचे नाव काजल नारायण मिस्किन (वय २५) असे आहे. तिचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते. गेल्या चार वर्षांपासून पती नारायण विलास मिस्किन, सासरे विलास रामचंद्र मिस्किन व सासू शोभा विलास मिस्किन (रा. दहीवली, ता. माढा) हे तिला ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आणण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ करीत होते.
शेतातील काम नीट करत नाही, पैसे आणत नाही, असे कारण काढून तिच्यावर अत्याचार करत होते. या असह्य छळामुळे काजल हिने गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण दिगंबर वागज (भाऊ) यांच्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पती, सासरे व सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?