Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमभंगामुळे तरूण नैराश्येत, गळफास घेऊन संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हटलं, ‘जिसे मैं पसंत करता था, उसने…’

रोहित बारंगे हा सध्या बुटीबोरीतील सीईएटी कंपनीत मागील तीन वर्षांपासून कामगार म्हणून कार्यरत होता. रोहित आणि त्याचा मित्र नितीन मदन बारंगे हे दोघेही बंडू नानाजी पिल्लारे यांच्या बुटीबोरीतील घरात भाड्याने राहत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 11, 2025 | 12:47 PM
प्रेमभंगामुळे तरूण नैराश्येत, गळफास घेऊन संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हटलं, 'जिसे मैं पसंत करता था, उसने...''

प्रेमभंगामुळे तरूण नैराश्येत, गळफास घेऊन संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हटलं, 'जिसे मैं पसंत करता था, उसने...''

Follow Us
Follow Us:

बुटीबोरी : कुटुंबीयांचा मानसिक त्रास आणि प्रेमात अपयश या दुहेरी कारणांमुळे एका 27 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुटीबोरी येथे उघडकीस आली आहे. रोहित कलीराम बारंगे (वय 27, रा. चौकीया, ता. बैतूल, मध्यप्रदेश, सध्या रा. प्रभाग क्र. 1, पठाण ले-आउट, बुटीबोरी, नागपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

रोहित बारंगे हा सध्या बुटीबोरीतील सीईएटी कंपनीत मागील तीन वर्षांपासून कामगार म्हणून कार्यरत होता. रोहित आणि त्याचा मित्र नितीन मदन बारंगे हे दोघेही बंडू नानाजी पिल्लारे यांच्या बुटीबोरीतील घरात भाड्याने राहत होते. दोघेही 2 एप्रिल रोजी मूळ गावी गेले होते. 4 मे रोजी दुपारी 1 वाजता फिर्यादी जेवणासाठी घरी आले असता रोहितच्या खोलीचे दार बाहेरून कुलूपबंद होते. जेवणानंतर जेव्हा ते पुन्हा कामावर जाण्यास निघाले, तेव्हा दार कुलूपमुक्त पण आतून बंद असल्याचे आढळले.

दरम्यान, दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून खोलीत डोकावले असता रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तत्काळ शेजारील लोकांना बोलावून पोलिसांना माहिती दिली. बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

‘जिसे मैं पसंत करता था उसने पहले…’

पोलिसांना घटनास्थळी रोहितच्या खोलीतील लाकडी टेबलावर एक सुसाईड नोट सापडली. हिंदीत लिहिलेल्या या चिठ्ठीत रोहितने लिहिले की, ‘मैं रोहित बारंगे सुसाइड कर रहा हूँ। मुझ पर किसी का भी दबाव नहीं है। क्योंकि मैं मेरी फॅमिली से परेशान हूँ। जिसे मैं पसंद करता था उसने पहले शादी के लिए हाँ कहा और अब मना कर रही है। मुझे समझ नहीं आ रहा है की मैं क्या करूं? इसलिए मैं अपने आप को समाप्त कर रहा हूँ। सॉरी मम्मी पापा’ या सुसाईड नोटमधून प्रेमभंगामुळे झालेली नैराश्यपूर्ण मानसिक अवस्था स्पष्ट होते. या घटनेने बुटीबोरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास बुटीबोरी पोलिस करत आहेत.

Web Title: A youth committed suicide due to love affair issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • Nagpur Case
  • Nagpur Crime News
  • Youth Suicide

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.