Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! फटाके फोडण्यास रोखल्याने तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; वाढदिवस साजरा करण्यास एकत्र आले अन्…

अक्षय मडावी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. सुजल आणि समीर यांचाही पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे सांगितले जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 10, 2026 | 09:24 AM
धक्कादायक ! फटाके फोडण्यास रोखल्याने तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; वाढदिवस साजरा करण्यास एकत्र आले अन्...

धक्कादायक ! फटाके फोडण्यास रोखल्याने तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; वाढदिवस साजरा करण्यास एकत्र आले अन्...

Follow Us
Follow Us:
  • नागपूरमधील देवनगर चौकात फटाके फोडण्यावरून वाद होऊन एका तरुणाची हत्या
  • मृत तरुणाचे नाव अमन ऊर्फ बॉबी सपाटे
  • मित्राच्या कारसमोर फटाके फोडण्यास केला होता विरोध
नागपूर : लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीतून झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला. मित्राच्या कारसमोर फटाके फोडण्यास विरोध केल्याने सराईत गुन्हेगार अक्षय मडावी आणि त्याच्या साथीदारांनी अमन ऊर्फ बॉबी सपाटे (वय २७, रा. जयभोले सोसायटी, पिंपळा फाटा) याच्यावर चाकूने हल्ला केला. पोटावर चाकूचा वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या अमनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्या तरुणांवर काही क्षणांतच दुःखाचा डोंगर कोसळला.

विशेष म्हणजे, याच वेळी बजाजनगर पोलिसांचे पथक परिसरातील एका शोरूमला लागलेली आग आटोक्यात आणण्याच्या व्यवस्थेत व्यस्त होते. या हत्येची दखल घेत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बजाजनगरचे ठाणेदार चेतनसिंह चौहान यांना तातडीने पोलिस मुख्यालयात पाठवले. ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास देवनगर चौकात घडली. अक्षय मडावी (वय २८, रा. नीलकमल अपार्टमेंट, जुना फुटाळा), सुजल ऊर्फ वॅक्स शेडाम, आदित्य ऊर्फ आदि कळसकर आणि समीर कावळे (रा. गिट्टीखदान), अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी रात्री उशिरा त्यांना अटक केली.

अक्षय मडावी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. सुजल आणि समीर यांचाही पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे सांगितले जाते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र

देवनगर येथील प्रसाद राऊत याचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी त्याने मित्रांना बोलावले होते. दिवाळी साजरी केल्यानंतर अमन हा मित्र अक्षय नौकरकर आणि अन्य मित्रांसह देवनगर येथे पोहोचला. याच परिसरात अक्षय मडावीही आपल्या साथीदारांसह आला होता. त्यामुळे चौकात सुमारे ३० ते ४० तरुण जमले होते.

शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत

अमनने आपली कार चौकात उभी केली असताना अक्षयच्या साथीदारांपैकी एकाने कारसमोर फटाके फोडण्यास सुरुवात केली. फटाक्यांमुळे कारला आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन अमनने त्याला फटाके फोडण्यास मनाई केली. यावरून आरोपीनी अमनशी वाद घातला. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने शाब्दिक वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले.

अक्षयने केले पोटावर चाकूने वार

भूषण खुरसुंगे याने मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यालाही धक्काबुक्की केली. अमनच्या बाजूने काही जण पुढे येत असल्याचे पाहून अक्षय मडावीने चाकू काढला. उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्याचदरम्यान अक्षयने अमनच्या पोटावर चाकूने वार केला. अमन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. या झटापटीत अन्य काही जणांनाही किरकोळ दुखापत झाली. अक्षय आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अमनला मित्रांनी तातडीने शासकीय मेडिकल दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

FAQ

1. नागपूरमध्ये तरुणाची हत्या कशामुळे झाली?

फटाके फोडण्यास विरोध केल्यामुळे झालेल्या वादातून तरुणाची हत्या झाली.

2. मृत तरुणाचे नाव काय आहे?

अमन ऊर्फ बॉबी सपाटे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

3. ही घटना कुठे घडली?

नागपूरमधील देवनगर चौकात ही घटना घडली.

Web Title: Youth stabbed to death after being stopped from bursting firecrackers nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • Murder Case
  • Nagpur Case

संबंधित बातम्या

Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून…
1

Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून…

Parking Dispute Murder: कार पार्किंग आणि कुत्र्यावरून झालेल्या वादातून टेक महिंद्राच्या आशिया प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या!
2

Parking Dispute Murder: कार पार्किंग आणि कुत्र्यावरून झालेल्या वादातून टेक महिंद्राच्या आशिया प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या!

Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!
3

Murder Case: पाणी मागताच तोंडावर लघुशंका! छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून तरुणाचा घेतला बळी; पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप!

Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!
4

Nashik Honor Killing: भेटायला बोलावून तरुणाचा काटा काढला; बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून धारदार चाकूने हत्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.