मंगळवेढ्यात आर्थिक वादातून एकाची हत्या; छातीतच चाकू भोसकला
पुणे : पुण्यात गपृुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पैशाच्या व्यवहारावरून हवेली परिसरात चौघांनी एका तरुणाची भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. तरुणाचा फिल्मी स्टाईल या चौघांनी पाठलाग केला आणि कोयत्याने वार करून खून केला. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आरोपी फरार झाले आहेत. सतीश थोपटे (वय ३४, रा. कोल्हेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, सतीश आणि यातील एका आरोपीची ओळख होती. त्याला 25 लाख रुपये सतीशने फ्लॅट घेण्यासाठी पैसे दिले होते. हा व्यवहार नेमका व्याजाने झाला होता का, की हात उसने म्हणून पैसे दिले होते, याचा अद्याप माहिती मिळू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या पैश्यावरून त्यांच्यात काही वाद झाले होते. त्यातून कोल्हेवाडी येथे भरदुपारी चौघांनी सतीशला गाठले. त्याच्यावर हल्ला केला. हल्ला होताच सतीश याने त्यांच्या तावडीतून पळ काढला. तेव्हा आरोपींनी त्याचा पाठलाग केला आणि भररस्त्यात गाठून त्याच्यावर कोयत्याने सपासप वारकरून खून केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : 15 वर्षीय मुलाला आमिष दाखवून नेले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच गेल्या काही दिवसाखाली जुन्या वादातून तिघांनी एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला केल्याचा प्रकार कोथरूडमध्ये घडला आहे. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात, कानाजवळ आणि दोन्ही तळहातावर हत्याराने वार केल्याने तो यात गंभीर जखमी झाला आहे. शास्त्रीनगर येथील कैलास मित्र मंडळाजवळ राहणाऱ्या दिनेश संदिप भालेराव (वय २७) हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्यानूसार, कोथरूड पोलिसांनी उदय थोरात (वय १८), निखिल थोरात (वय २१) आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २४ नोव्हंबरला रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी सर्व एकाच परिसरात राहतात. ते एकमेकांना आधीपासून ओळखतात. त्यांच्यात वादही आहेत. घटनेच्या दिवशी तक्रारदार तरूण कैलास मित्र मंडळाजवळील कट्ट्यावर बसला होता. आरोपी उदय थोरातने तक्रारदाराला पाहिल्यावर इतर आरोपींना बोलावून घेतले. जुन्या वादाच्या रागातून आरोपींनी तक्रारदाराला शिवीगाळ केली. तेव्हा तक्रारदार तेथून निघून जात असताना, आरोपी थोरात यांनी आणलेल्या हत्याराने तक्रारदाराच्या डोक्यात, कानाजवळ आणि दोन्ही तळहातांवर घाव घातले. त्यात तक्रारदार गंभीर जखमी झाला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप देशमाने आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.