Demanding bribes as illegal fees
भंडारा : रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी मालकाकडून 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या वरठी येथील सहायक पोलिस निरीक्षक राजेश सदाशिव बाभरे (वय 56) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराचा रेती वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीचा टिप्पर चालविणाऱ्या चालकाविरुद्ध वरठी पोलिस ठाण्यात 1 सप्टेंबर रोजी अपघातसंदर्भात गुन्हा दाखल करून टिप्पर वरठी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला होता.
हेदेखील वाचा : Pune Crime News: गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरटयांनी केली हातसफाई; ३० तासांमध्ये ३०० मोबाईल चोरीला
वरठी पोलिस ठाण्यातील कर्मचारी टिप्पर सोडविण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागत आहेत, अशी तक्रार तक्रारदाराने 6 सप्टेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे दिली होती. तक्रारीची पडताळणी केली असता, पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडीअंती 2 हजार रुपये स्वतः घेण्याची तयारी बाभरे यांनी दर्शविली. त्यानंतर मात्र लाचेची रक्कम देत असताना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली नाही.
या प्रकरणी पोलिस स्टेशन वरठी येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश बाभरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमित डहारे, पोलिस हवालदार मिथुन चांदेवार, पोलिस नाईकस अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, पोलिस शिपाई चेतन पोटे, राजकुमार लेंडे यांनी केली.
हेदेखील वाचा : वडिलांचा नकार, घराची आर्थिक परिस्थिती अन् 3 इडियट्स चित्रपटातूने आली उमेद, अन् करू शकलो मोठा विक्रम; सचिन खिलारीने उलगडला इतिहास
वरवंड येथील घरात पोलिसांचा छापा
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरवंड येथे एका घरात पोलीसांनी छापा टाकून तब्बल ११ लाख २ हजार ६४० रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुटख्यांची पोतीच्या पोती जप्त केली आहेत. या प्रकरणी रेवणनाथ हरीभाऊ गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता हे लाचप्रकरण समोर आले आहे.