
crime (फोटो सौजन्य: social media)
तिच्या गळ्यात काचेचा तुकडा घुसला तरीही…
या अपघातात पार्वती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. अपघातात तिच्या गळ्यात काचेचा तुकडा घुसला होता. बसने पेट घेतल्याचे समजताच तिने आपल्या दोन मुलांना खिडकी बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. मात्र तिचा रक्तस्त्राव जास्त झाल्याने तिचा जीव वाचू शकला नाही. तिचा दीर गुलझारी याने रुग्णालयामध्ये तिचा शोध घेतला तेव्हा तीचा कुठेही शोध लागला नाही.
पार्वती आपल्या पतीला भेटण्यास जात होती
पार्वती देवी तिच्या दोन मुलांसह उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील तिच्या गावी नोएडाला तिचा पती गोविंदला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी अपघातात तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी काय माहिती दिली?
पोलिसांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, १३ जणांचे या अपघातात होरपळून मृत्यू झाला आहे. बहुतेक मृतदेह ओळखण्यापलीकडे आहेत. आगीत जळालेले अवशेष गोळा करून शवविच्छेदनासाठी काळ्या पिशव्यांमधून रुग्णालयात नेण्यात आले आहे. जळालेल्या मृतदेहांचे डीएनए तपासणी करून नातेवाइकांनी दिलेल्या माहितीशी मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
यमुनानगर एक्स्प्रेस वेवरील अपघाताची घटना ही बलदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनास्थळी केवळ जळलेल्या बसगाड्या आणि कारचे सांगाडे उरले होते. ते रस्त्यावरून हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आल्या. ‘यमुना एक्स्प्रेस वेच्या आग्रा ते नोएडा पट्ट्यात धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अनेक वाहनांची धडक झाली. यातील काही वाहनांनी पेट घेतला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’, असे मथुरेचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक श्लोक कुमार यांनी सांगितले.
मृतांपैकी तिघांची ओळख पटली असून, अखिलेंद्र प्रताप यादव (४४, प्रयागराज), रामपाल (७५, महाराजगंज) आणि सुलतान अहमद (६२, गोंडा) अशी त्यांची नावे आहेत. उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी या अपघाताच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी (प्रशासन) अमरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बलदेव पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्यनाथ यांनी केले ट्विट
तर या अपघाताबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सोशल मिडीया ‘एक्स’वरून अपघातातील मृतांच्या नातेवाइकांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली.
Ans: पहाटेच्या दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली.
Ans: एकूण 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
Ans: मृतांच्या नातेवाइकांना 2 लाख व जखमींना 50 हजार रुपयांची मदत.