Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: सरपंचपदासाठी जन्मदात्या बापानेच केली चिमुकलीची हत्या; खरेदी करण्यासाठी जातो म्हणत चिमुकलीला नेलं नंतर…

नांदेडमध्ये सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी वडिलानेच सात वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. खरेदीसाठी जातो असे सांगून मुलीला तेलंगणात नेऊन कॅनॉलमध्ये फेकल्याचा आरोप आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 03, 2026 | 09:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळला
  • तेलंगणा पोलिसांकडून आरोपीला अटक
  • सरपंचपदासाठी तीन अपत्यांचा अडसर असल्याची चर्चा
नांदेड: नांदेड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सरपंचपदाची निवडणूक लढण्यासाठी वडिलानेच आपल्या चिमुकलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे. मात्र सरपंचपदासाठी त्याने का हत्या केली आपल्याच चिमुकलीची जाणून घ्या.

काय घडलं नेमकं?

आरोपीचं नाव पांडुरंग कोंडामंगले (३२) असे आहे. तो मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याचा बाऱ्हाळी येथे हेअर कटिंगचे दुकान आहे. त्याला तीन मुलं आहेत. तीन दिवसांपूर्वी पांडुरंग याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सात वर्षाची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये फेकून दिले. त्यानंतर तो घरी एकटाच परत आला.

Gadchiroli News: गडचिरोलीत काळजाला चटका! 10 वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या

दुसरीकडे कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. त्यांना चौकशीत पांडुरंगवर संशय बळावला. त्यांनतर या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी पांडुरंगला अटक केली. यांनतर गावात चर्चेला उधाण आले. यानंतर गावात खळबळ उडाली.

गावात चर्चा काय?

आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याच बोलले जात आहे. तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी असल्याची चर्चा होती. मात्र त्याला तीन मुले असल्याने निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरू नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरु आहे. महाराष्ट्रात तीन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे त्याने हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास करत आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. आता काय पोलीस तपासात समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

Latur Crime: लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित हाणामारी; तरुणावर धारधार शास्त्राने केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरातील कॅनॉलमध्ये.

  • Que: हत्येचे खरे कारण स्पष्ट झाले का?

    Ans: नाही, नेमके कारण अद्याप तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

  • Que: हत्येचे कारण काय असल्याची चर्चा आहे?

    Ans: सरपंचपदासाठी तीन अपत्यांचा नियम अडसर ठरू नये म्हणून.

Web Title: Nanded crime father murders his own young daughter for the sarpanch position he took the little girl away saying he was going to buy something and then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
1

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
2

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
3

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार
4

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.