Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नुकताच PG ला प्रवेश आणि…; नागपूर मेडिकलच्या तरुण निवासी डॉक्टरची आत्महत्या

नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागातील 26 वर्षीय निवासी डॉक्टर ऋत्विक ठाकूर यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नुकताच PG अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय वर्तुळ हादरले आहे. कारण अस्पष्ट.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 03, 2026 | 10:06 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ऋत्विक सागर ठाकूर (वय 26), मूळ रहिवासी बुलढाणा
  • नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात निवासी डॉक्टर
  • गणेशपेठ येथील हॉटेलमध्ये केली आत्महत्या
नागपूर: नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्ररोग विभागातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरने काल सोमवारी सकाळी शहरातील एक हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव ऋत्विक सागर ठाकूर (वय २६) असे आहे. त्याने नुकताच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. या घटनेने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गणेशपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Nanded Crime: सरपंचपदासाठी जन्मदात्या बापानेच केली चिमुकलीची हत्या; खरेदी करण्यासाठी जातो म्हणत चिमुकलीला नेलं नंतर…

काही दिवसांपूर्वी झाला होता रुजू

ऋत्विक सागर ठाकूर (वय २६) हा बुलढाणा येथील रहिवासी आहे. त्यांनी मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले होते. दोन्ही पालक डॉक्टर असलेल्या ऋत्विकला नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता आणि २७ जानेवारी २०२६ रोजी तो कॉलेजमध्ये रुजू झाला होता. तो विभागप्रमुख डॉ. दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये कार्यरत होता.

काय घडलं नेमकं?

सध्या ऋत्विक हा गणेशपेठ मध्यवर्ती बस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये राहत होता. तो कॉलेजला न आल्याने डॉ. उमरे यांनी त्यांच्या वडिलांना संपर्क साधला.
वडिलांनी वारंवार त्याला कॉल केले. मात्र कॉल करूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यात आला. कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा ऋत्विक यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही आहे. पोलीस या सगळ्याचा तपास करत आहे. या घटनेने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सहकारी डॉक्टरांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आले आहे.

Gadchiroli News: गडचिरोलीत काळजाला चटका! 10 वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत डॉक्टर कोण होते?

    Ans: ऋत्विक सागर ठाकूर, 26 वर्षीय निवासी डॉक्टर.

  • Que: आत्महत्येचे कारण काय?

    Ans: द्याप स्पष्ट झालेले नाही; सुसाइड नोट सापडलेली नाही.

  • Que: डॉक्टर कोणत्या विभागात कार्यरत होते?

    Ans: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर – नेत्ररोग विभाग.

Web Title: Nagpur crime recently admitted to pg and then a young resident doctor from nagpur medical commits suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
1

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय
2

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार
3

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
4

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.