Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव कार झाडाला आदळल्याने अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर

अनियंत्रित कार महानगरपालिकेच्या मलजल उपसा केंद्रासमोरच्या रस्त्याच्या पलीकडे झाडावर आढळली. अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचा पुढचा व मागील भाग पूर्णपणे दबला गेल्याने चक्काचूर झाला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 12, 2025 | 03:14 PM
झाडावर कार आदळून चालक ठार

झाडावर कार आदळून चालक ठार

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : भरधाव वेगात वाहने जात असल्याने अनेक रस्ते अपघात होताना दिसत आहे. असे असताना नाशिकच्या पंचवटीत अपघात झाला. तपोवनातून लक्ष्मी नारायण मंदिर मार्गे पंचवटी अमरधामकडे जाणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामध्ये होंडा सिटी कार एका झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

देवळाली कॅम्प येथील 21 वर्षीय चालक सुरज संजय यादव याचा मृत्यू झाला. तर कारमधील तिघे जखमी झाले. देवळाली कॅम्प येथील सुरज यादव (वय २२), राजेश हरी ठाकूर (वय २१), प्रियांशू मोही विश्वकर्मा (वय २३), सतीश संतोष यादव (वय २२) असे चौघेजण मध्यरात्री काळ्या रंगाच्या होंडा सिटी कारमधून (एमएच ०१ वीयू ३११२) तपोवन बाजूने पंचवटी अमरधाम रस्त्याने जात असताना भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले.

हेदेखील वाचा : मूल-चिचाळा रस्त्यावर भीषण अपघात; कार-दुचाकीमध्ये जोरदार धडक, दोघांचा मृत्यू

अनियंत्रित कार महानगरपालिकेच्या मलजल उपसा केंद्रासमोरच्या रस्त्याच्या पलीकडे झाडावर आढळली. अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचा पुढचा व मागील भाग पूर्णपणे दबला गेल्याने चक्काचूर झाला होता. अपघातात प्रियांशू विश्वकर्मा, राजेश ठाकूर तसेच सतीश यादव हे जखमी झाले असून, विश्वकर्मा व ठाकूर हे किरकोळ जखमी झाले तर यादवच्या पायाला गंभीर मार लागला असून, या जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शंभरच्या स्पीडने कार असल्याची शक्यता

अपघातग्रस्त कार ही शंभर ते सव्वाशे प्रति तास वेगाने असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अपघाताची घटना घडल्यानंतर त्याच परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अमोल पाटील, अनिल सोर, संदीप बाविस्कर या कर्मचाऱ्यांनी कारचा दरवाजा तोडून अडकलेल्यांना बाहेर काढत रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविले.

चंद्रपूरच्या थेरगावात भीषण अपघात

दुसऱ्या एका घटनेत, चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील थेरगाव येथे भीषण अपघात झाला. कार आणि दुचाकी या वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. थेरगाव येथे जात असलेल्या दुचाकीस्वारांना ताडाळाकडून मूलकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिली. यात दोन जण जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. ११) दुपारी घडली.

Web Title: Accident in nashik one dies on the spot three seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • Accident in Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक
1

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Tapovan Tree Cutting: तपोवनप्रश्नी बैठक निष्फळ : एकही झाड न तोडू देण्यावर ठाम; आंदोलन सुरूच राहणार
2

Tapovan Tree Cutting: तपोवनप्रश्नी बैठक निष्फळ : एकही झाड न तोडू देण्यावर ठाम; आंदोलन सुरूच राहणार

Sayaji Shinde meets Raj Thackeray : नाशिकच्या तपोवनासाठी सयाजी शिंदेंनी गाठली मुंबई; मनसे नेते राज ठाकरेंची घेतली भेट
3

Sayaji Shinde meets Raj Thackeray : नाशिकच्या तपोवनासाठी सयाजी शिंदेंनी गाठली मुंबई; मनसे नेते राज ठाकरेंची घेतली भेट

Health Sciences University Scam: बनावट पावत्यांचा खेळ; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मोठा आर्थिक अपहार
4

Health Sciences University Scam: बनावट पावत्यांचा खेळ; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मोठा आर्थिक अपहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.