Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Godavari Investment and Impact Conclaveचे आयोजन; नाशिकला प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव

नाशिक येथील ताज गेटवे आयोजित 'गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह'चे उद्घाटन केले. यावेळी शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 25, 2026 | 04:07 PM
Proposal for Regional Innovation Center for Nashik at Godavari Investment and Impact Conclave

Proposal for Regional Innovation Center for Nashik at Godavari Investment and Impact Conclave

Follow Us
Follow Us:

Nashik News : नाशिक : महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी नाशिक येथील ताज गेटवे आयोजित ‘गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन केले. या परिषदेत वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, गुंतवणूकदार, स्टार्टअप्स आणि परिसंस्था उभारणी करणाऱ्या संस्थांचा सहभाग होता. शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला. (Nashik News)

उद्घाटन सत्राला नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद, CSRBOX चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भोमिक शाह आणि Diageo in Society चे ग्लोबल डायरेक्टर जेम्स अॅशल उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील समन्वयातून तुकड्या-तुकड्यांच्या उपक्रमांऐवजी प्रणालीगत व नाविन्यता-आधारित परिणाम साध्य करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

हे देखील वाचा : ठाकरे गटाचा आरोप ठरला खरा? मुंबई पालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय

यावेळी डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले की, “महाराष्ट्रातील जिल्हास्तरावर नाविन्यता परिसंस्था मजबूत करण्याचा राज्याचा रोडमॅप मांडला आणि नाशिकला स्वतंत्र प्रादेशिक नाविन्यता केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्र स्टार्टअप धोरणांतर्गत नाविन्यात सोसायटी कल्पनेपासून विस्तारापर्यंत स्टार्टअप्सना मार्गदर्शन, संस्थात्मक भागीदारी, भांडवल उपलब्धता आणि शासकीय समन्वय यांद्वारे एकात्मिक सहाय्य प्रणाली उभारत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच त्यांनी रेअर अर्थ मेटल्स आणि महत्त्वपूर्ण खनिज मूल्यसाखळी यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्सनी संशोधन व नाविन्यता-आधारित उपाय विकसित करण्याचे आवाहन केले.

डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थी, नवउद्योजक आणि प्रारंभीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी तळागाळात मायक्रो-इन्क्युबेटर्स स्थापन करण्याचा मानस आहे. या विकेंद्रित दृष्टिकोनातून महानगरांबाहेरील स्थानिक प्रतिभेला चालना मिळेल आणि प्रादेशिक समस्यांवर स्थानिक उपाय निर्माण होतील.” नाशिकमधील ३० हून अधिक उद्योग प्रतिनिधींशी झालेल्या गोलमेज परिषदेत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाश्वत पायाभूत सुविधा, हवामान बदल अनुकूलन, पाणी व कचरा व्यवस्थापन तसेच तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक प्रणाली यावर चर्चा झाली. CSR आणि नाविन्यता-आधारित हस्तक्षेपांच्या माध्यमातून कुंभला जागतिक स्तरावरील “लिव्हिंग लॅब” म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली.

हे देखील वाचा : रामदास आठवलेंसह विनोद तावडेंनाही राज्यसभेत संधी? पार्थ पवारांचा मार्ग सुकर

डॉ. पाटील यांच्या हस्ते सस्टेनेबिलिटी इनोव्हेशन लॅब अंतर्गत निवडलेल्या स्टार्टअप्सना पारितोषिक वितरण करण्यात आले. नाविन्यता-आधारित आणि प्रभावाभिमुख उद्योजकतेला चालना देण्याची नाविन्यता सोसायटी बांधिलकी त्यांनी पुनः अधोरेखित केली. यावेळी आयोजित प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यता संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. श्रीकांत पाटील यांनी स्टार्टअप्स, इन्क्युबेटर्स, गुंतवणूकदार आणि परिसंस्था सक्षमीकरण करणाऱ्या संस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रादेशिक स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्याची दृष्टी मांडली. ग्रामीण भागातील नाविन्यता, इन्क्युबेशन नेटवर्क आणि परिणामाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळात प्रभाव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी राबवत असलेल्या धोरणात्मक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह तसेच प्रादेशिक स्टार्टअप संवादाच्या माध्यमातून नाशिकला नाविन्यता-आधारित शाश्वत विकासाचे प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. यावेळी नासिक-त्र्यंबकेश्वर कुंभ मेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय उपस्थित होते.

Web Title: Proposal for regional innovation center for nashik at godavari investment and impact conclave

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • daily news
  • Nashik News
  • Nashik News Update

संबंधित बातम्या

बोटांचे ठसे जुळत नसल्याने ज्येष्ठांना मिळेना एसटीचे NCMC कार्ड; पर्यायी व्यवस्थाही नसल्याने अडचणींत वाढ
1

बोटांचे ठसे जुळत नसल्याने ज्येष्ठांना मिळेना एसटीचे NCMC कार्ड; पर्यायी व्यवस्थाही नसल्याने अडचणींत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.