हृदयद्रावक ! कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 10 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; आई गंभीर
सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावर बिघडलेला ट्रक सिंदखेड राजा टोल प्लाझाकडे घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या गॅस टँकरला धडक दिली. या विचित्र अपघातात गॅस टँकरचा चालक जखमी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
हेदेखील वाचा : Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी
समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर चॅनेल क्रमांक 328 वर मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये (एमएच 46/ बीबी 0386) शनिवारी (दि. 1) अचानक बिघाड झाला. त्यामुळे दुसऱ्या ट्रॅकने (सीजी 04/पीई 7301) त्याला साखळदंडाने बांधून सिंदखेड राजा टोल प्लाझाकडे नेले जात होते. या दरम्यान बिघडलेला ट्रक अचानक पाठीमागे आला. त्यामुळे नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या गॅस टँकरला (एमएच 10/ सीआर- 5768) जबर धडक दिली. या विचित्र अपघातात गॅस टँकरच्या चालकाच्या केबिनचा चुराडा झाला. त्यामध्ये टँकरचालक रफिक अहमद (38, रा. उत्तर प्रदेश) हा जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त दोन्ही वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल वानखडे, प्रियंका काळे, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर, शैलेश पवार, क्यूआरव्ही पथकाचे श्रीकांत काळे, राहुल पवार, पृथ्वीराज राठोड, डॉ. यासिन शेख, मुकेश जाधव, हरिभाऊ काकडे, भगवान गायकवाड, विठ्ठल काळुसे आदी कर्मचाऱ्यांनी मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली.
शनिवारीही झाला होता अपघात
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (दि.१) रात्री या महामार्गावर सिन्नरजवळ एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारचा ताबा सुटल्याने ती साईड अँगलला धडकली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी रत्नागिरी येथील असून, ते प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला आणि देवदर्शनासाठी गेले होते. समृद्धी महामार्गाने परतत असताना त्यांना हा दुर्दैवी अपघात झाला.
सापुताडा घाटात अपघात
नाशिक-सूरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बस दरीत कोसळून ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं आहे. रविवारी पहाटे साडेपाच वाजता हा भीषण अपघात झाला आहे.
हेदेखील वाचा : Nashik Accident : नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस कोसळली दरीत